नांदेड : नांदेड शहरात दरवर्षीप्रमाणे याही वर्षी परशुराम जयंती निमित्त भव्य परशुराम तेजोत्सव कार्यक्रमाचे आयोजन दि.17-18-19 एप्रिल हे तीन दिवस भरभ

नांदेड : नांदेड शहरात दरवर्षीप्रमाणे याही वर्षी परशुराम जयंती निमित्त भव्य परशुराम तेजोत्सव कार्यक्रमाचे आयोजन दि.17-18-19 एप्रिल हे तीन दिवस भरभरून राज्यातील विविध मान्यवरांच्या उपस्थितीत कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे.
दि.17 एप्रिल 2026 सायंकाळी सहा वाजता परशुराम आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष कॅप्टन आशिष दामले (कॅबिनेट मंत्री दर्जा ) यांच्या प्रमुख उपस्थितीत या महोत्सवाचे उद्घाटन होणार आहे. तसेच या कार्यक्रमाला राष्ट्रवादीचे आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर, वसमत विधानसभेचे आमदार राजू नवघरे, माजी आमदार ओमप्रकाश पोकर्णा, माजी आमदार मोहनअण्णा हंबर्डे, जिल्हा पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार, डॉ. गोविंद कुलकर्णी, मोहिनीताई पत्की, सोनल भोसीकर, राम तडवळकर, विलास कौसडीकर, शंतनु सुभेदार, उदय महा, पालघरचे बाबा जोशी , निवृत्ती जोशी, दिनेश पाठक, कोमल जोशी, अकोल्याचे श्याम कुलकर्णी, राजेंद्र टाकळकर, अमरावतीचे वैद्य व त्यांची टीम व महाराष्ट्रातून अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. तसेच या कार्यक्रमात श्री क्षेत्र दत्तधाम परभणी येथील मठाधिपती सद्गुरु प.पू. श्री मकरंद महाराज (गुरुतत्त्वदीप दीपस्तंभ पुरस्कार), भाजपाचे संजय कौडगे (उत्कृष्ट संघटन), डॉ नितीन जोशी (धन्वंतरी पुरस्कार), दडू पुरोहित (उद्योगरत्न पुरस्कार), ड. व्यंकटेश पाटनुरकर (श्रीराम सेवक गौरव पुरस्कार), ड. यदुपथ अर्धापुरकर (ब्रह्मभूषण पुरस्कार) यांना मान्यवरांच्या हस्ते विशेष पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. या महोत्सवामध्ये तीनही दिवस सामाजिक, शैक्षणिक, पत्रकारिता , प्रशासकीय , आर्थिक, व्यवस्थापन, राजकीय व सांस्कृतिक क्षेत्रातील विविध मान्यवरांना विशेष पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. सिने अभिनेते शरद पोंक्षे यांचे ’प्रखर हिंदुत्व’ विषयावर व्याख्यान असणार आहे. या कार्यक्रमाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेला वधू वर मेळावा काही अपरिहार्य कारणामुळे रद्द करण्यात आल्याचे संयोजकांनी सांगितले आहे. कार्यक्रमानंतर लगेचच सर्वांसाठी अल्पोपहाराची व प्रसादाची सोय करण्यात आली आहे. नांदेड शहरात होणार्या ’परशुराम तेजोत्सव’ कार्यक्रमास सहकुटुंब उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे आवाहन अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ प्रदेशाध्यक्ष निखिल लातूरकर यांनी केले आहे.

COMMENTS