बीड : पुस्तक वाचनाने माणूस घडतो, असे प्रतिपादन सौ. केशरबाई सोनाजीराव क्षीरसागर ऊर्फ काकू कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शिवा

बीड : पुस्तक वाचनाने माणूस घडतो, असे प्रतिपादन सौ. केशरबाई सोनाजीराव क्षीरसागर ऊर्फ काकू कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शिवानंद क्षीरसागर यांनी केले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून महाविद्यालयाच्या ग्रंथालय विभागात दिनांक 12 एप्रिल 2026 रोजी सलग 18 तास वाचन उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना प्राचार्य डॉ. क्षीरसागर म्हणाले की, विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण होण्यासाठी असे उपक्रम अत्यंत महत्त्वाचे आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेला शिका, संघटित व्हा, संघर्ष करा हा संदेश आयुष्य घडविण्यासाठी मार्गदर्शक ठरतो. नियमित वाचनामुळे व्यक्तिमत्त्वाचा सर्वांगीण विकास होतो, त्यामुळे विद्यार्थ्यांनी अधिकाधिक वेळ पुस्तके वाचनासाठी द्यावा, असेही त्यांनी सांगितले. या उपक्रमात महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. संजय पाटील देवळानकर, उपप्राचार्य डॉ. अनिता शिंदे, पदव्युत्तर विभाग प्रमुख डॉ. खान ए. एस., कमवि उपप्राचार्य डॉ. नारायण काकडे, पर्यवेक्षक प्रा. जालिंदर कोळेकर, ग्रंथपाल प्रा. शेख जी. आय. आदी उपस्थित होते. या उपक्रमात महाविद्यालयातील 20 विद्यार्थी व प्राध्यापकांनी सलग 18 तास वाचन करून सक्रिय सहभाग नोंदविला. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ग्रंथालयातील श्री. अंगद दराडे व श्री. लक्ष्मण सोन्नर यांनी विशेष सहकार्य केले. हा उपक्रम विद्यार्थ्यांमध्ये वाचनसंस्कृती रुजविण्यासाठी प्रेरणादायी ठरला.

COMMENTS