Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

डॉ. आंबेडकरांचे उपकार विसरू नयेत : चौरे 

अकोले  : आपल्या समाजाला डॉ.बाबासाहेबांच्या विचारांची, संविधानाची गरज आहे. संविधानातील आरक्षणामुळेच एस.सी., एस.टी. बांधवांना नोकऱ्या मिळाल्या आहेत

पूजा शेळके यांची शासकीय सेवेत निवड; वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते नियुक्ती आदेश प्रदान
अकोलेत गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार; समता परिषद व ओबीसी संघटनेकडून आयोजन
भंडारदरा परिसरातील गावांना धरणाचे पाणी सर्वेक्षणास मंजुरी ; आठवड्यात प्राथमिक सर्वेक्षण पूर्ण करण्याचे आदेश

अकोले  : आपल्या समाजाला डॉ.बाबासाहेबांच्या विचारांची, संविधानाची गरज आहे. संविधानातील आरक्षणामुळेच एस.सी., एस.टी. बांधवांना नोकऱ्या मिळाल्या आहेत. म्हणून डॉ. बाबासाहेबांचे उपकार विसरता कामा नये. समाजाने बाबासाहेबांचा आदर्श घेतला पाहिजे असे प्रतिपादन परिवर्तन कमिटीचे संस्थापक नवल चौरे यांनी केले.

 कोकणवाडी येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी ते बोलत होते. यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर, राघोजी भांगरे, सावित्रीबाई फुले, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन व संविधानाचे वाचन करून कार्यक्रमाला सुरुवात झाली. 

 लक्षण मेमाणे यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा त्याग संघर्ष, कार्य, शौर्य आणि पराक्रम तसेच स्वातंत्र्य, समता, बंधुता, राष्ट्रीय एकात्मता सांगून त्यांच्या शौर्याला आणि पराक्रमाला अभिवादन केले.

 कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते संतोष पोपेरे यांनी समाजाला आरक्षण कसे मिळाले ? ते कसे टिकवले पाहिजे ? आरक्षणामुळे नोकऱ्या मिळाल्या मात्र सरकार आज संविधान बदलू पाहत आहे म्हणून समाजाने जागृत व्हावे हे पटवून देण्यासाठी त्यांनी अनेक उदाहरणे दिली.

 कार्यक्रमाच्या अध्यक्षा सरपंच सुलोचना जाधव यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त शुभेच्छा देऊन अभिवादन केले. यावेळी नवल चौरे, परिवर्तन कमिटीचे अध्यक्ष प्रकाश जाधव, नारायण जाधव, हिरामण जाधव, गुलाब गोडे, मीराबाई तळपाडे, गुलाब बेंडकोळी, नामदेव जाधव, शंकर जाधव, ग्रामसेवक विनायक धराडे, दीपक जाधव, अरुण जगताप, सुभाष जगताप, बहिरु आव्हाड, अरुण गाढे, अर्जुन भांगरे, एस. के. जाधव उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या शेवटी “इवाव तमातसू फाऊंडेशन”, श्री आयुब इब्राहिम (अमेरिका) यांच्या तर्फे विद्यार्थ्यांना शालेय साहित्य व खाऊ देण्यात आला. विकास जाधव यांनी सूत्रसंचालन केले.

COMMENTS