अकोले : भाजपा कार्यकर्त्यांनी जनतेला उद्योजक बनविणाऱ्या शासनाच्या योजनांची माहिती देतानाच स्वतःही रोजगारनिर्मितीकडे लक्ष दिल्यास प्रशिक्षण वर्ग अ

अकोले : भाजपा कार्यकर्त्यांनी जनतेला उद्योजक बनविणाऱ्या शासनाच्या योजनांची माहिती देतानाच स्वतःही रोजगारनिर्मितीकडे लक्ष दिल्यास प्रशिक्षण वर्ग अधिक फलदायी ठरतील, असा विश्वास भाजप प्रशिक्षण वर्गाचे प्रदेश सहसंयोजक प्रदीप पेसकर यांनी व्यक्त केला. संगमनेर विधानसभा मतदारसंघातील मंडलांच्या वतीने आयोजित ‘पंडित दीनदयाळ उपाध्याय प्रशिक्षण महाअभियान’च्या समारोप प्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वसंतराव गुंजाळ होते.
यावेळी शहराध्यक्ष पायल ताजणे, पश्चिम मंडळ अध्यक्ष श्रीकांत गोमासे, पूर्व मंडळ अध्यक्ष गुलाबराजे भोसले आदी पदाधिकारी उपस्थित होते. पेसकर यांनी आपल्या मार्गदर्शनात पक्षनिष्ठा, संघटनशक्ती आणि कार्यकर्त्यांची जबाबदारी यावर सविस्तर भाष्य केले. प्रत्येक कार्यकर्त्याने समाजाशी सातत्याने संपर्क ठेवत पक्षाची विचारधारा घराघरात पोहोचवावी, असे आवाहन त्यांनी केले. त्यांच्या मार्गदर्शनामुळे कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य व आत्मविश्वास निर्माण झाल्याचे दिसून आले.
प्रशिक्षणाच्या विविध सत्रांमध्ये मान्यवरांनी मार्गदर्शन केले. ‘पक्षाचा विस्तार’ या विषयावर सिताराम भांगरे यांनी बूथस्तरावर काम करण्याचे महत्त्व अधोरेखित केले. ‘वैचारिक अधिष्ठान’ या विषयावर रोहित चौधरी यांनी तत्त्वनिष्ठ राजकारणाची जाणीव करून दिली. डॉ. महेंद्र कोल्हे यांनी ‘आपली कार्यपद्धती’, तर काशिनाथ पावसे यांनी ‘आपल्या सरकारची कामगिरी’ यावर सविस्तर माहिती दिली.
आधुनिक काळातील तंत्रज्ञानाचा वापर लक्षात घेऊन साहेबराव वलवे व भाऊसाहेब वाकचौरे यांनी ‘सोशल मीडिया, नमो ऍप व आयटी सेल’ या विषयावर मार्गदर्शन केले.
या प्रशिक्षण महाअभियानात कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत प्रत्येक सत्राचा लाभ घेतला. पदाधिकाऱ्यांचे नेतृत्व, कार्यकर्त्यांची एकजूट आणि नियोजनबद्ध आयोजन यामुळे हा उपक्रम यशस्वी ठरल्याचे मानले जात आहे. या प्रशिक्षणामुळे कार्यकर्त्यांना वैचारिक स्पष्टता, संघटनात्मक कौशल्ये आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करण्याची दिशा मिळाल्याने आगामी काळात पक्ष संघटना अधिक बळकट होण्यास मदत होणार आहे.

COMMENTS