फतेहगढ साहिब : पंजाबमधील फतेहगढ साहिब परिसरात बैसाखी उत्सवानिमित्त दर्शन करून परतणार्या भाविकांच्या बसचा भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत सहा जणांच

फतेहगढ साहिब : पंजाबमधील फतेहगढ साहिब परिसरात बैसाखी उत्सवानिमित्त दर्शन करून परतणार्या भाविकांच्या बसचा भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत सहा जणांचा मृत्यू झाला असून पंधरा जण जखमी झाले आहेत. जखमींमध्ये लहान मुलांचाही समावेश असल्याने घटनेने हळहळ व्यक्त होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सुमारे चाळीस भाविकांना घेऊन बस आनंदपूर साहिब येथून बैसाखी मेळा आटोपून परतत होती. रात्री उशिराच्या सुमारास बस बस्सी पठाणा तालुक्यातील मैण माजरी गावाजवळ पोहोचली असता अचानक तांत्रिक बिघाड झाला. चालकाचे नियंत्रण सुटल्याने बस रस्त्याच्या कडेला असलेल्या विजेच्या खांबावर आदळून उलटली.

COMMENTS