Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

सर्वोच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला न्यायाधीश फातिमा बीवी यांचे निधन

मुंबई : सर्वोच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला न्यायाधीश फातिमा बीवी यांचे वयाच्या 96 व्या वर्षी निधन झाले आहे. फातिमा बीवी यांनी तमिळनाडूच्या राज्

पुणे रेल्वेची पार्सल सेवा तुमच्या दारी
पत्नीऐवजी दिला भलत्याच पुरुषाचा मृतदेह | LOK News 24
आपल्या राष्ट्रीय खेळाचा दुष्काळ भारतीय संघाने संपवला- छगन भुजबळ

मुंबई : सर्वोच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला न्यायाधीश फातिमा बीवी यांचे वयाच्या 96 व्या वर्षी निधन झाले आहे. फातिमा बीवी यांनी तमिळनाडूच्या राज्यपाल म्हणून देखील काम केले आहे. गुरुवार 23 नोव्हेंबर रोजी रुग्णालयात त्यांचे निधन झाले. केरळच्या आरोग्य मंत्री वीणा जॉर्ज यांनी फातिमा बीवी यांच्या निधनावर शोक व्यक्त केला.
केरळच्या आरोग्यमंत्री वीना जॉर्ज यांनी म्हटले की, फातिमा बीवी या एक बहाद्दुर महिला होत्या. त्यांच्या नावावर आजवर कित्येक रेकॉर्ड नोंदवण्यात आलेत. त्यांनी आपल्या जगण्यातून दाखवून दिले आहे की, दृढ इच्छाशक्तीवरुन कोणत्याही प्रतिकूल परिस्थितीवर मात करता येते. फातिमा बीवी यांचे पूर्ण नाव मीरा साहिब फातिमा बीवी असे आहे. त्यांचा जन्म 30 एप्रिल 1927 रोजी रोजी केरळ मधल्या पतनमतिट्टा या गावात झाला. त्यांच्या वडिलांचे नाव मीर साहिब, तर आईचे नाव ख़दीजा बीबी आहे.फातिमा बीवी यांनी त्रिवेंद्रम येथून बी.एस.सी.ची आणि तिरुवनंतपुरम या शहरातून बी.एल. ही पदवी घेतली.  6 ऑक्टोंबर 1989 मध्ये त्यांना सर्वोच्च न्यायालयामध्ये न्यायाधीश म्हणून त्याची निवड झाली.  भारतातून एवढ्या मोठ्या पदावर जाणार्‍या त्या पहिल्या  पहिल्या महिला होत्या.29 एप्रिल 1992 रोजी त्या सेवानिवृत्त झाल्या. दरम्यान त्यांनी 1997 ते 2001 या काळात तमिळनाडूच्या राज्यपाल म्हणून देखील काम पाहिले आहे.

COMMENTS