https://www.youtube.com/watch?v=_kLyt2Z9wOI सध्या पश्चिम आशियातील आखाती देशांमध्ये भडकलेला युद्धाचा वणवा आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर खनिज तेलाच्या
सध्या पश्चिम आशियातील आखाती देशांमध्ये भडकलेला युद्धाचा वणवा आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर खनिज तेलाच्या दरात झालेली प्रचंड वाढ यामुळे गेल्या काही दिवसांपासून भारतात पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढतील, अशी जोरदार चर्चा सुरु आहे. ही भीती आता खरी ठरण्याची शक्यता आहे. येत्या काही दिवसांमध्ये पेट्रोलियम कंपन्यांकडून पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढवले जातील, अशी दाट शक्यता वर्तविली जात आहे.
रशिया युक्रेन युद्ध , मध्य आशियातील युद्ध परिस्थितीत कधी कच्च्या तेलाची किंमत 120 डॉलर्स प्रति बॅरल गेली तर कधी 70 डॉलर्सवरही आली, पण भारतात पेट्रोल डिझेल किंमतीमध्ये कोणतेही बदल झाले नव्हते. गेल्या महिन्यात दिवसाला काही कंपन्यांना 2400 कोटीचे नुकसानही सहन करावे लागले होते. सरकारने उत्पादन शुल्क कमी करण्याचा निर्णय घेतल्यामुळे मोठ्या प्रमाणावर कंपन्यांनी तोट्याचे गणित सावरले आहे. परंतु सरकारी कंपन्यांना हा भार फार काळ पेलता येणार नाही. त्यामुळे पेट्रोल – डिझेलच्या किंमती पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीनंतर वाढवल्या जातील, असा अंदाज भारतीय अर्थविश्वात व्यक्त केला जातो आहे. इंधनाचे दर वाढल्यास दैनंदिन जीवनातील अनेक वस्तूंचे भाव वाढू शकतात. त्यामुळे आता पुढे काय घडणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
एप्रिल 2022 पासून शासकीय इंधन कंपन्यांनी दर वाढवलेले नाहीत. या कंपन्यांना पेट्रोल प्रतिलिटर 18 रुपये आणि डिझेल प्रतिलिटर 35 रुपये तोटा सहन करावा लागतो , अशी माहिती सूत्रांनी वृत्तसंस्थेला दिली आहे. इंडियन ऑइल , भारत पेट्रोलियम, हिंदुस्थान पेट्रोलियम अशा शासकीय कंपन्यांनी एप्रिल 2022 पासून किंमती वाढवलेल्या नाहीत. एप्रिल 2022 पासून पेट्रोल – डिझेलच्या किंमती शासकीय कंपन्यांनी स्थिर ठेवल्या आहेत.
पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीमुळे पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीचा निर्णय रोखून धरण्यात आल्याची चर्चा होती. मात्र, येत्या काही दिवसांमध्ये तामिळनाडू आणि पश्चिम बंगालमधील मतदान संपताच पेट्रोल-डिझेल दरवाढीबाबत निर्णय घेतला जाऊ शकतो, असे समजते.

COMMENTS