Homeताज्या बातम्याअहमदनगर

कौडगावातील अनाधिकृत खनन तातडीने बंद कराग्रामस्थांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन, आंदोलनाचा इशारा

अहिल्यानगर : तालुक्यातील कौडगाव येथे सुरू असलेल्या अनाधिकृत खनन प्रकरणावर तातडीने कारवाई करून खाण बंद करण्याची मागणी ग्रामपंचायत सदस्य तथा युवासेना जिल्हा उपप्रमुख सोमनाथ कांडके यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.निवेदनात नमूद केल्याप्रमाणे, कौडगाव येथील शेती गट क्रमांक ५९/३ मध्ये प्रतिक युवराज पवार यांनी कोणतीही शासकीय परवानगी न घेता खोदकाम सुरू केले आहे. सदर परिसर बाळेवाडी, कौडगाव तसेच नगर-पाथर्डी राष्ट्रीय महामार्गालगत असल्याने येथे मोठी वर्दळ असते. खाणीत होणाऱ्या संभाव्य स्फोटांमुळे मोठी दुर्घटना घडण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे.  खोदकामाबाबत ग्रामपंचायत कार्यालयाची कोणतीही परवानगी किंवा पूर्वकल्पना देण्यात आलेली नसल्याचे निवेदनात म्हटले आहे.सदर खाण परिसरात नागरी वस्ती, शेती व फळबाग मोठ्या प्रमाणावर असून पर्यावरणावर विपरीत परिणाम होत असल्याची तक्रार करण्यात आली आहे. हा परिसर निसर्गरम्य असून जवळच बाळनाथ गड हे धार्मिक व पर्यटनस्थळ आहे. त्या मार्गालगत खाण सुरू केल्याने पर्यटकांसोबत दुर्घटना होऊ शकत असल्याचे निवेदनात नमूद आहे.दरम्यान, संबंधित खाण तातडीने बंद करण्यात यावी, अन्यथा आठ दिवसांनंतर कोणतीही पूर्वसूचना न देता तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा कौडगाव ग्रामपंचायत सदस्य तथा युवासेना जिल्हा उपप्रमुख सोमनाथ कांडके यांनी दिला आहे. यावेळी अनिकेत चेमटे, विजय कांडके,मुबारक शेख, नवाब शेख, राम परभणे,पोपट कांडके, नितीन साठे आदी उपस्थित होते.कोटग्रामपंचायत व ग्रामस्थांचा तीव्र विरोध असताना गावात अनधिकृत खनन सुरू आहे. या संदर्भात जिल्हाधिकारी व प्रशासनाला निवेदनाद्वारे कारवाई करण्याची मागणी केली आहे. यापूर्वी अनेकदा प्रशासनाला ही बाब लक्षात आणून दिलेली आहे. आता प्रशासनाने चुकीचे काम करणाऱ्यांना पाठीशी घातल्यास, ग्रामस्थांचे आरोग्य व शेती, फळबागांच्या प्रश्नासाठी ग्रामस्थांसह तीव्र आंदोलन केले जाईल. वेळ पडल्यास महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या कार्यालयासमोर देखील आंदोलन केले जाईल.– सोमनाथ कांडके, ग्रामपंचायत सदस्य तथा युवासेना जिल्हा उपप्रमुख, अहिल्यानगर

दहावी परीक्षेत जगदंबा विद्यालयाचे यश 
‘ठोळे’ विद्यालयात रहिवासी प्रमाणपत्र वितरण सोहळा
बातमीत इंग्रजी शब्द आहेत; संजीवनी इंजिनिअरिंगच्या आठ विद्यार्थ्यांना नोकरी 

COMMENTS