Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

युवकांनी शेतकर्‍यांच्या बांधावर जाऊन मोफत केली पीक नोंदणी

सामाजिक कार्यकर्ते सुनिल केसकर,वैजीनाथ केसकर यांनी घेतला पुढाकार

कर्जत/प्रतिनिधीः  कर्जत तालुक्यातील तरडगाव येथील सामाजिक कार्यकर्ते सुनिल रामदास केसकर यांनी थेट शेतकर्‍यांच्या बांधावर जाऊन ई- पीक पाहणी अ‍ॅपद्व

अहमदनगरचे नाव शाह शरीफ नगर करा…
पिसे येथील पिरसाहेब यात्रा कोरोनामुळे रद्द | ‘माझं गाव माझी बातमी’ | LokNews24
’साधूसंत येती घरा तोची दिवाळी दसरा ः भागवत मुठे पाटील

कर्जत/प्रतिनिधीः  कर्जत तालुक्यातील तरडगाव येथील सामाजिक कार्यकर्ते सुनिल रामदास केसकर यांनी थेट शेतकर्‍यांच्या बांधावर जाऊन ई- पीक पाहणी अ‍ॅपद्वारे शेतकर्‍यांच्या पिकाची नोंद करून घेतली. गावातील सुशिक्षित तरुणांना या अ‍ॅपचे व पीक पेरा नोंदीची माहिती समजावून सांगितली .त्यांनी शेतकर्‍यांना पिक नोंद करून घेण्याचे आवाहन केले आहे.
शेतकर्‍यांना आता ई-पीक पहाणी अ‍ॅपच्या माध्यमातून पीक पेर्‍याची 15 सप्टेंबर 2023 पर्यंत नोंदणी करावी लागणार आहे. सध्या दुष्काळाचे सावट पाहता ज्या शेतकर्‍यांनी पीकविमा भरला आहे. त्या पीकाची नुकसान भरपाईपोटी राज्य सरकार पीकविम्याच्या मोबदल्यामध्ये 25 टक्के रक्कम तातडीने शेतकर्‍यांना देण्याच्या विचाराधीन आहे. त्यासाठी पीक पेर्‍याची नोंद करणे गरजेचे आहे. आधीच दुष्काळाच्या झळा शेतकरी सोसत असताना घरात अठराविश्‍व दारिद्र्य असतांना त्यातच अधून-मधून अस्मानी आणि सुलतानी संकटामुळे कायम परिस्थितीचे चटके सोसणार्‍या कित्येक शेतकर्‍यांच्या हातात मोबाईल फोनच नाही. काहींना असला तरी त्याची परिपूर्ण माहिती नसल्यामुळे ही नोंदणी करणे बळीराजासाठी अडचणीचे होते. ग्रामीण भागातील अज्ञानी शेतकर्‍यांना तांत्रिक मार्गदर्शन कोण करणार. असा गंभीर प्रश्‍न निर्माण झाला होता.
या अडचणीच्या काळात तरडगाव येथील शेतकर्‍यांच्या, गोरगरीब कष्टकर्‍यांच्या हाकेला धावून जाणारे सामाजिक कार्यकर्ते सुनिल केसकर हे शेतकर्‍यांच्या मदतीसाठी पुढे आले आहेत. ज्या शेतकर्‍यांना ऑनलाईन पीक पेर्‍याची नोंदणी करता येत नाही. त्यांना विनामूल्य स्वतःच्या मोबाईलद्वारे आतापर्यंत शंभरहून अधिक शेतकर्‍यांच्या पिकांची नोंदणी करून देण्याचे कार्य त्यांनी केले आहे. त्यामुळे तरडगाव येथील शेतकर्‍यांना मोठी मदत झाली आहे. युवक सामाजिक कार्यकर्ते सुनिल केसकर हे नेहमीच सामाजिक उपक्रमांमध्ये अग्रेसर असतात. या पुढील काळात पीक पेर्‍याची नोंदणी करताना शेतकर्‍यांना कुठलीही अडचण आल्यास आपण सदैव तयार राहू.असा विश्‍वास देत गावातील सर्व शेतकर्‍यांनी नोंदीसाठी संपर्क साधण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.त्यासाठी त्यांना तरडगावचे तलाठी रेखा खंडागळे, कृषी सहाय्यक अधिकारी विश्‍वास तोरडमल व ग्रामविकास अधिकारी बापूसाहेब निंबोरे, वैजीनाथ केसकर, सखाराम केसकर, रोहित केसकर तसेच तरडगाव ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य यांचे मोलाचे सहकार्य लाभत आहे.अशी माहिती सामाजिक कार्यकर्ते वैजीनाथ केसकर यांनी दिली.

COMMENTS