बीड :बीड शहरात दरवर्षी प्रमाणे याहीवर्षी दि.5 ते 14 या कालावधीत जयभीम महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. त्या अनुषंगाने महिलांच्या विविध स्पर्धा मोठ

बीड :
बीड शहरात दरवर्षी प्रमाणे याहीवर्षी दि.5 ते 14 या कालावधीत जयभीम महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. त्या अनुषंगाने महिलांच्या विविध स्पर्धा मोठ्या उत्साहात संपन्न झाल्या, या स्पर्धेत सर्वच वयोगटातील स्पर्धक मोठ्या संख्येने हभागी झाले होते.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 व्या जयंतीनिमित्त शुक्रवारी (दि.10) रोजी महिलांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धांचे नियोजन अरुणाताई आठवले यांनी सुयोग्य पद्धतीने केले.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शैलजा ओव्हाळ होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून अण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळाचे व्यवस्थापक प्रणिता बोराडे, शिलताई सिरस1ट, मंदा मस्के आदी मान्यवर उपस्थित होते. स्पर्धेदरम्यान महिलांनी विविध महापुरुषांच्या प्रतिमा तसेच आकर्षक रेखाटने साकारून आपले कौशल्य दाखविले. महिलांच्या सुप्त कलागुणांना वाव मिळावा आणि त्यांना प्रोत्साहन मिळावे या उद्देशाने या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. सहभागी महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभल्याने कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.स्पर्धेचे परीक्षक म्हणून डॉ. पल्लवी इलापर्ले आणि डॉ. वंदना फाटले यांनी काम पाहिले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रमिला सरवदे यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. पांडुरंग सुतार यांनी केले, तर आभार प्रिती सिरसाट यांनी मानले. दरवर्षी प्रमाणे याहीवर्षी महिलांच्या स्पर्धांचा हा उपक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समितीच्या पदाधिकार्यांनी मोलाचे योगदान दिले.

COMMENTS