बीड :जागतिक आरोग्य दिनाचे औचित्य साधून आदित्य आयुर्वेद महाविद्यालय व संशोधन केंद्र, बीड यांच्या वतीने ‘स्वयंपाकघरातील औषधी वनस्पतींचे प्रदर्शन’ ह

बीड :
जागतिक आरोग्य दिनाचे औचित्य साधून आदित्य आयुर्वेद महाविद्यालय व संशोधन केंद्र, बीड यांच्या वतीने ‘स्वयंपाकघरातील औषधी वनस्पतींचे प्रदर्शन’ हा आगळावेगळा उपक्रम आयोजित करण्यात आला आहे. या उपक्रमात जास्तीत जास्त नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विवेक कुलकर्णी यांनी केले आहे.
आपल्या दैनंदिन स्वयंपाकघरात अशा अनेक वनस्पती, मसाले आणि घटक उपलब्ध असतात जे केवळ अन्नाची चव वाढवत नाहीत, तर शरीरासाठी उपयुक्त औषधी गुणधर्मही बाळगतात. याच संकल्पनेवर आधारित या प्रदर्शनात सुमारे 100 हून अधिक औषधी वनस्पतींची माहिती, त्यांचे उपयोग आणि योग्य वापर पद्धती प्रत्यक्ष स्वरूपात सादर केली जाणार आहे. या प्रदर्शनाची प्रमुख वैशिष्ट्ये म्हणून मिरे, हळद, सुंठ, इलायची यांसारख्या घरगुती घटकांचे आरोग्यदायी फायदे सविस्तरपणे समजावून सांगितले जाणार आहेत. मिरे सर्दी-खोकला व घशातील खवखव कमी करण्यास उपयुक्त आहे, हळद रोगप्रतिकारशक्ती वाढवणे व जखम भरून येण्यास मदत करते, सुंठ सांधेदुखी कमी करण्यास तसेच रक्ताभिसरण सुधारण्यास उपयोगी ठरते, तर इलायची पचनक्रिया सुधारण्यास व रक्तदाब संतुलित ठेवण्यास मदत करते. या प्रदर्शनात विविध औषधी वनस्पतींचे स्वतंत्र स्टॉल उभारण्यात येणार असून नागरिकांना प्रत्यक्ष पाहणी व माहिती घेण्याची संधी मिळणार आहे. घरगुती वनस्पतींचा वापर करा, आयुष्य आपले सुंदर करा, असा संदेश देत डॉ. कुलकर्णी यांनी नागरिकांना या उपक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे. सदर प्रदर्शन शनिवार, दि. 11 एप्रिल 2026 रोजी सायंकाळी 4 ते 7 या वेळेत राष्ट्रीय कन्या शाळा, साखरा पार्क, लेन नं. 3, एम.आय.डी.सी. परिसर, बीड येथे आयोजित करण्यात आले आहे. नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या आरोग्यदायी उपक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

COMMENTS