खरवंडी कासार : पाथर्डी तालुक्यातील मिडसांगवी येथे श्री सालशिद्धबाबा देवस्थान यात्रा ११, १२ व १३ एप्रिल २०२६ दरम्यान मोठ्या उत्साहात साजरी होणार असून विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यात्रेनिमित्त परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले आहे. शनिवार (दि. ११) रोजी रात्री ९ वाजता ह.भ.प. निवृत्ती महाराज इंदोरीकर यांचे हरिकीर्तन होणार आहे. रविवार (दि. १२) रोजी सकाळी ९.३० ते १२.३० या वेळेत ह.भ.प. महंत न्यायाचार्य डॉ. नामदेव महाराज शास्त्री यांच्या प्रमुख उपस्थितीत तसेच ह.भ.प. महंत हनुमंत महाराज शास्त्री यांच्या शुभहस्ते विविध धार्मिक विधी पार पडणार आहेत. कावड यात्रेतून आणलेल्या पाण्याने श्रींचे अभिषेक स्नान करण्यात येणार असून सायंकाळी छबीना मिरवणूक व आकर्षक फटाक्यांची आतषबाजी होणार आहे. रविवारी रात्री ९ ते १२ या वेळेत संगीत मैफिल व रंगारंग कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सोमवार (दि. १३) रोजी रात्री लोकनाट्य तमाशाचा बहारदार कार्यक्रम होणार असून दुपारी ४ ते ६ या वेळेत कुस्त्यांचा जंगी आखाडा रंगणार आहे. कुस्त्यांसाठी रोख बक्षिसांची व्यवस्था करण्यात आली असून प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकासाठी आकर्षक बक्षिसे ठेवण्यात आली आहेत. यात्रेच्या पार्श्वभूमीवर परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमांचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्री सालशिद्धबाबा देवस्थान ट्रस्ट व मिडसांगवी ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले आहे. दरम्यान, मिडसांगवी येथे होणाऱ्या यात्रेनिमित्त १२ ते १४ एप्रिलदरम्यान परिसरात मटण व मांस विक्री पूर्णतः बंद ठेवण्यात यावी, अशी मागणी विश्व हिंदू परिषद व बजरंग दलाच्या वतीने करण्यात आली आहे.

खरवंडी कासार : पाथर्डी तालुक्यातील मिडसांगवी येथे श्री सालशिद्धबाबा देवस्थान यात्रा ११, १२ व १३ एप्रिल २०२६ दरम्यान मोठ्या उत्साहात साजरी होणार असून विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यात्रेनिमित्त परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले आहे.
शनिवार (दि. ११) रोजी रात्री ९ वाजता ह.भ.प. निवृत्ती महाराज इंदोरीकर यांचे हरिकीर्तन होणार आहे. रविवार (दि. १२) रोजी सकाळी ९.३० ते १२.३० या वेळेत ह.भ.प. महंत न्यायाचार्य डॉ. नामदेव महाराज शास्त्री यांच्या प्रमुख उपस्थितीत तसेच ह.भ.प. महंत हनुमंत महाराज शास्त्री यांच्या शुभहस्ते विविध धार्मिक विधी पार पडणार आहेत. कावड यात्रेतून आणलेल्या पाण्याने श्रींचे अभिषेक स्नान करण्यात येणार असून सायंकाळी छबीना मिरवणूक व आकर्षक फटाक्यांची आतषबाजी होणार आहे.
रविवारी रात्री ९ ते १२ या वेळेत संगीत मैफिल व रंगारंग कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सोमवार (दि. १३) रोजी रात्री लोकनाट्य तमाशाचा बहारदार कार्यक्रम होणार असून दुपारी ४ ते ६ या वेळेत कुस्त्यांचा जंगी आखाडा रंगणार आहे. कुस्त्यांसाठी रोख बक्षिसांची व्यवस्था करण्यात आली असून प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकासाठी आकर्षक बक्षिसे ठेवण्यात आली आहेत.
यात्रेच्या पार्श्वभूमीवर परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमांचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्री सालशिद्धबाबा देवस्थान ट्रस्ट व मिडसांगवी ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले आहे. दरम्यान, मिडसांगवी येथे होणाऱ्या यात्रेनिमित्त १२ ते १४ एप्रिलदरम्यान परिसरात मटण व मांस विक्री पूर्णतः बंद ठेवण्यात यावी, अशी मागणी विश्व हिंदू परिषद व बजरंग दलाच्या वतीने करण्यात आली आहे.

COMMENTS