Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

खोटी पाठ थोपटून घेणाऱ्यांना कामातून उत्तर : सभापती वैशालीताई वाजेवाजे

कोपरगाव : शहराच्या विकासासाठी ठोस कामे करूनच उत्तर देणार असल्याचा टोला विरोधकांना लगावत, “खोटी पाठ थोपटून घेणाऱ्यांना आम्ही कामातूनच उत्तर देत आह

अवघ्या दोनशेच्या स्टॅम्पवर व्यावसायिक वीज कनेक्शन; शेतकऱ्यांना मात्र महिनोन्‌महिने प्रतीक्षा; कोपरगावात महावितरणच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह
दक्षिणकाशी पुणतांबा तीर्थक्षेत्र विकासासाठी निधी द्या ; माजी आ. कोल्हे यांची मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे मागणी
संजीवनी इंजिनिअरिंगच्या नऊ विद्यार्थ्यांना नोकरी
खोटी पाठ थोपटून घेणाऱ्यांना आमचे कामातून उत्तर : वैशाली वाजे

कोपरगाव : शहराच्या विकासासाठी ठोस कामे करूनच उत्तर देणार असल्याचा टोला विरोधकांना लगावत, “खोटी पाठ थोपटून घेणाऱ्यांना आम्ही कामातूनच उत्तर देत आहोत,” अशी प्रतिक्रिया पाणीपुरवठा सभापती वैशालीताई वाजे यांनी दिली. ब्रिजलाल नगर परिसरातील पाण्याची टाकी व पाईपलाईनच्या यशस्वी चाचणीवेळी त्या बोलत होत्या.

 युवानेते विवेक कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली “आता थांबायचं नाही” या भूमिकेतून शहरातील विकासकामांना गती देण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. प्रशासकीय काळात मागील चार ते साडेचार वर्षे बंद पडलेली कामे पुन्हा सुरू करण्यात आली असून, नागरिकांना प्रत्यक्ष लाभ मिळावा यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी नमूद केले.

 शनिवारी (दि. ११ एप्रिल) ब्रिजलाल नगर येथे नगराध्यक्ष पराग संधान यांच्या उपस्थितीत पाण्याच्या टाकी व पाईपलाईनची चाचणी पार पडली. यावेळी उपनगराध्यक्ष जितेंद्र रणशूर, गटनेते प्रसाद आढाव, पाणीपुरवठा सभापती वैशालीताई वाजे यांच्यासह पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

नगराध्यक्ष पराग संधान म्हणाले, की पाणीपुरवठा समितीच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे ही योजना प्रत्यक्षात आणता आली. ब्रिजलाल नगरसह जोशी नगर, श्रद्धानगरी, शंकरनगर, माधवनगर आणि बोरावके वस्ती या भागांतील नागरिकांना आता नळजोडणीद्वारे पाणी मिळणार आहे. या योजनेसाठी जागा उपलब्ध करून दिल्याबद्दल मनोजशेठ अग्रवाल यांचे विशेष योगदान असल्याचे त्यांनी नमूद केले.

COMMENTS