आशा सेविकांचे प्रलंबित प्रश्‍न तातडीने सोडवा – स्नेहलता कोल्हे

Homeमहाराष्ट्रअहमदनगर

आशा सेविकांचे प्रलंबित प्रश्‍न तातडीने सोडवा – स्नेहलता कोल्हे

कोपरगांव/ता.प्रतिनिधी : गेल्या दोन वर्षात कोरोना महामारीत आशा सेविकांनी जिवावर उदार होत घरोघर जात रुग्णांची काळजी घेऊन कोरोना जनजागृतीत मोठे काम केले

कर्जतमध्ये संगीतमय कार्यक्रमासह सामाजिक उपक्रम उत्साहात
सर्व समाजघटकांच्या प्रगतीसाठी दर्जेदार विकासकामे करा : उपमुख्यमंत्री पवार
अखेर महिला अत्याचारप्रकरणी गोविंद मोकाटेला झाली अटक

कोपरगांव/ता.प्रतिनिधी : गेल्या दोन वर्षात कोरोना महामारीत आशा सेविकांनी जिवावर उदार होत घरोघर जात रुग्णांची काळजी घेऊन कोरोना जनजागृतीत मोठे काम केले पण त्यांची दिवाळी अधांतरीच आहे, शासनाने त्यांचे प्रलंबित प्रश्‍नांत तातडीने घालून ते सोडवावे, त्यांना नियमित वेतन द्यावे अशी मागणी भाजपच्या प्रदेश सचिव स्नेहलता कोल्हे यांनी राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याकडे एका पत्राद्वारे केली आहे.
कोल्हे यांनी पत्रात पुढे म्हटले आहे की, कोरोना महामारीत राज्यातील आरोग्य यंत्रणेवर विशेष ताण आहे. केंद्र शासनाने प्रत्येक राज्याला सातत्याने मोठा मदतीचा हात दिलेला आहे. कोरोनात आरोग्य जनजागृतीसाठी आरोग्य सेवकाबरोबरच, आशा सेविका, असंख्य ज्ञात अज्ञात कोरोना योध्यानी काम केले व आजही करीत आहे. अंगणवाडी ताई देखील मदतीला आहे. आशा सेविका या परिस्थीतीत घरोघर जाऊन काम करत आहे पण त्या उपाशी पोटी आहे. त्यांचे वेतन अनियमित असून आशा सेविकांपुढे प्रपंचाबरोबरच पोटाची खळगी भरायची कशी असा प्रश्‍न पडला आहे. आशा सेविका या प्राथमिक आरोग्य केंद्राबरोबरच अन्य बाबतीत महत्वाचा घटक आहे. त्यांचे प्रश्‍न आणि प्रलंबीत समस्यावर वारंवार मोर्चे, उपोषणे आंदोलने होतात त्यावर बैठका घेतल्या जातात, प्रश्‍न तसेच राहतात, राज्य स्तरावर मोठे मोठे निर्णय घेतले जातात पण त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी होत नाही. अंमलबजावणी न झाल्याने आशा सेविकांपुढे जगण्याचे प्रश्‍न निर्माण झाले आहे. कोरोना महामारीत शासनाच्या आरोग्य योजनाबरोबरच स्थानिक स्वराज्य संस्था, ग्रामपंचायतीने त्यांचेवर अतिरिक्त कामाचा बोजा _ताण दिला आहे, हा ताण हलका करू तुमच्या समस्या सोडवू असे आश्‍वासन प्रत्येकवेळी दिले जाते पण आशा सेविकांच्या मागण्यांना वाटाण्याच्या अक्षदा दाखविल्या जातात तेव्हा त्यांचे प्रश्‍न सोडवून शासनाने भावाची भूमिका बजावत त्यांचे जीवनाचा व कामात आनंदाचा क्षण निर्माण करावा असे स्नेहलता कोल्हे यांनी म्हटले आहे.

COMMENTS