Homeअहमदनगरमुंबई - ठाणे

‘तेरे सुर और मेरे गीत’ कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसादमुंबई, नागपूरसह नांदेडच्या गायक-वादकांनी रंगवली सुरेल मैफल

नांदेड येथे आयोजित करण्यात आलेल्या ‘तेरे सुर और मेरे गीत’ या सांगीतिक कार्यक्रमाला रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. प्रसिद्ध गायिका मेघा संजीव

नांदेड जिल्हा केमिस्ट अँड ड्रगिस्ट संघटनेच्या निवडणुकीवर प्रश्नचिन्हअंतिम मतदार यादीत नाव नसतानाही उमेदवारी ग्राह्य; प्रसाद वाघमोडे यांची तक्रार
डी-मार्ट तिहेरी हत्याकांडाचा तपास वेगात; आश्रयदात्यांवरही पोलिसांनी फास आवळला;आणखी 2 आरोपी जेरबंद; मुख्य सूत्रधार साई लाला अद्याप फरार
नांदेड शहरातील खंडित वीजप्रश्नी महापौरांचा आक्रमक पवित्रा



नांदेड येथे आयोजित करण्यात आलेल्या ‘तेरे सुर और मेरे गीत’ या सांगीतिक कार्यक्रमाला रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. प्रसिद्ध गायिका मेघा संजीवन यांच्या ‘स्वरमेघ म्युझिक कल्चर’च्या वतीने आयोजित या कार्यक्रमाने श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले.
येथील शंकरराव चव्हाण प्रेक्षागृहात रंगलेल्या या कार्यक्रमाचे उद्घाटन नांदेड परीक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक शहाजी उमाप यांच्या हस्ते झाले. यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार, शिवसेना आमदार हेमंत पाटील, भाऊराव चव्हाण सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष नरेंद्र चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे संयोजन इंजि. संजीवन गायकवाड व सौ. नंदा गायकवाड यांनी केले. मुख्य गायिका मेघा संजीवन, संपादक व गायक केशव घोणसे पाटील आणि जयचंद्र तत्तापुरे यांनी पाहुण्यांचे स्वागत केले. अजरामर गायक लता मंगेशकर, मोहम्मद रफी तसेच दिवंगत अभिनेते धर्मेंद्र यांना समर्पित या कार्यक्रमात सुवर्णकाळातील गाजलेली गीते सादर करण्यात आली. लता मंगेशकर, मोहम्मद रफी, किशोर कुमार, आशा भोसले, सुमन कल्याणपूर यांच्या अजरामर गीतांनी वातावरण भारावून गेले. कार्यक्रमात नांदेडच्या सुप्रसिद्ध गायिका मेघा संजीवन यांच्यासह मुंबईतील गिनीज बुकमध्ये नाव नोंदवलेले गायक संतोष कपारे यांनी विशेष रंगत आणली. तसेच केशव घोणसे पाटील, इंजि. जयचंद्र तत्तापुरे, सावजी दुमाने आणि मयूर सावजी यांनीही आपल्या सुरेल सादरीकरणाने रसिकांची मनं जिंकली. मुंबई, नागपूर आणि नांदेड येथील गायक-वादकांच्या एकत्रित सादरीकरणामुळे कार्यक्रमाला वेगळीच उंची लाभली. अखेरपर्यंत रंगलेल्या या मैफलीने संगीतप्रेमींना अविस्मरणीय अनुभव दिला.

COMMENTS