श्रीरामपूर : श्रीरामपूर येथील मेनरोडवरील आगाशे सभागृहात लोककलावंत साहित्यिक परिषद, महाराष्ट्र राज्य आणि लक्ष्मीमाता ट्रस्ट वडाळा महादेव यांच्या स

श्रीरामपूर : श्रीरामपूर येथील मेनरोडवरील आगाशे सभागृहात लोककलावंत साहित्यिक परिषद, महाराष्ट्र राज्य आणि लक्ष्मीमाता ट्रस्ट वडाळा महादेव यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार दि.12 एप्रिल 2026 रोजी सकाळी 10:30 वाजता ज्येष्ठ साहित्यिक डॉ. बाबुराव उपाध्ये यांच्या अध्यक्षतेखाली तर राष्ट्रवादीचे सरचिटणीस अरुण पा. नाईक हे उद्घाटक आहेत, या कविसंमेलनास उपस्थितीत राहण्याचे आवाहन संयोजक कवी, गीतकार बाबासाहेब पवार यांनी केले.
पोलीस अधिकारी संजय भोंडगे हे स्वागताध्यक्ष असून प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र संपादक परिषदेचे कार्याध्यक्ष, प्रकाश कुलथे, ज्येष्ठ साहित्यिक सायमन भारस्ककर, काटेस्वामी पतसंस्थेचे चेअरमन, कवी अनिरुध्द महाले तर वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष चरण त्रिभुवन, कवी मोहिनीराज होन यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. या कविसंमेलनात राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत. उपजिल्हा ग्रामीण रुग्णालयाचे सेवानिवृत्त डॉ. संजय दुशिंग यांच्या अध्यक्षतेखाली निमंत्रित कवी- कवयित्री आपल्या बहारदार कविता सादर करणार आहेत.दुपारी 1:00 वाजेपर्यंत आयोजित कविसंमेलनास उपस्थित राहण्याचे आवाहन कवी, गीतकार बाबासाहेब पवार, भाऊसाहेब भोंडगे व पदाधिकारी यांनी केले.

COMMENTS