Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

अधिवेशनात 8 हजार 609 कोटींच्या पुरवणी मागण्या सादर

मुंबई : अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी विधानसभेमध्ये उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री अजित पवार यांनी एकूण आठ हजार 609.17 कोटी रु

छत्रपती संभाजी महाराज याच्या जयंती निमित्त अनाम प्रेम संस्थेस छावा संघटनेच्या वतीने सामाजिक उपक्रम
कर्जतच्या भूमी अभिलेख कार्यालयातील २ कर्मचारी लाचलुचपतच्या जाळ्यात
महाराष्ट्रातील 5 ग्रामपंचायतींचा राष्ट्रीय पंचायत पुरस्काराने सन्मान

मुंबई : अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी विधानसभेमध्ये उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री अजित पवार यांनी एकूण आठ हजार 609.17 कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या सादर केल्या. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबई महानगरपालिका सुधारणा विधेयक 2024 मांडले. उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र पोलीस सुधारणा विधेयक 2024 आणि सहकार मंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी महाराष्ट्र सहकारी संस्था सुधारणा विधेयक 2024 मांडले.
राज्य विधिमंडळाच्या सन 2024 अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या कामकाजास विधानसभेत ‘वंदे मातरम आणि राज्यगीत ‘जय जय महाराष्ट्र माझा’ ने सुरुवात झाली. विधानसभा अध्यक्ष अ‍ॅड. राहुल नार्वेकर, उपाध्यक्ष नरहरी झिरवळ, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्यासह मंत्री आणि विधानसभेचे सदस्य यावेळी उपस्थित होते.

मुंबईतील आझाद मैदान येथे विविध मागण्यांसाठी आंदोलन पुकारलेल्या आशा सेविकांच्या मागण्यांबाबत शासन सकारात्मक असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टिवार यांनी विधानसभेमध्ये याबाबतचा मुद्दा उपस्थित केला होते. त्यास उत्तर देताना उपमुख्यमंत्री पवार म्हणाले की, शासन आशा सेविकांच्या मागण्यांबाबत सकारात्मक आहे. आंदोलकांनी सहकार्याची भूमिका घ्यावी, असे आवाहनही त्यांनी केले. चर्चा करून आशा सेविकांचे प्रश्‍न सोडवले जातील, असेही उपमुख्यमंत्री पवार यांनी सांगितले.

दरम्यान, विधान सभा आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते आणि महाविकास आघाडीच्या आमदारांनी विधान भवनाच्या पायर्‍यांवर जोरदार निदर्शने केले. विरोधी पक्षाच्या आमदारांनी मराठा आणि ओबीसी समाजाची आरक्षणाच्या मुद्द्यावर फसवणूक करणार्‍या सरकारविरोधात घोषणा लिहिलेले फलक घेत जोरदार घोषणाबाजी करत परिसर दणाणून सोडला. जरांगे हे कोणाचे पाप, हे सर्वांना माहिती आहे. कोणाचे ओएसडी आणि पीए त्यांना भेटण्यासाठी जात होते, हे देखील पूर्ण महाराष्ट्राला माहिती असल्याची टीका विधानसभेचे विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे. राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली. या अधिवेशनाच्या पार्श्‍वभूमीवर विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी राज्य सरकार तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जारेदार हल्हाबोल केला. राज्यात सुरू असलेल्या मराठा आरक्षणाच्या प्रश्‍नावर त्यांनी सडकून टीका केली.

विधिमंडळाच्या पायर्‍यांवर विरोधकांची घोषणाबाजी – राज्यविधीमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन मुंबई येथे सुरू झाले. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी कामकाज सुरू होण्यापूर्वीच विधिमंडळाच्या पायर्‍यांवर विरोधकांनी आंदोलन केले. आरक्षणाच्या मुद्यावरून विरोधक आक्रमक झाले. ’फसवणूक नको आरक्षण द्या’, ’महायुती सरकारचा जागर, आरक्षणाचे रोज नवीन गाजर’ म्हणत सरकारच्या विरोधात जोरदार निदर्शने केली. याप्रसंगी विरोधकांनी पायर्‍यांवर धिक्कार असो, मराठा समाजाच्या जीवाशी खेळणार्‍या सरकारचा धिक्कार असो, मराठा समाजाची फसवणूक करणार्‍या सरकारचा धिक्कार असो, मराठा-ओबीसींची फसवणूक करणार्‍या सरकारचा धिक्कार असो, अशा घोषणा देत सरकार विरोधात निदर्शने केली.

COMMENTS