Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पैठणीवर ‘बिकिनी ब्लाऊज’ घातल्याने आकांक्षा पुरी ट्रोल; महाराष्ट्राच्या महावस्त्राचा अपमान केल्याचा आरोप, अभिनेत्रीने दिले उत्तर!

मुंबई : बॉलिवूड, टेलिव्हिजन आणि भोजपुरी सिनेसृष्टीत आपल्या दमदार अभिनयानं वेगळी ओळख निर्माण केलीय. पण, अभिनेत्री आकांक्षा पुरीला खरी ओळख मिळाली त

मुंबईत पुन्हा हिट अ‍ॅण्ड रन
पालकत्व स्वीकारण्यास असमर्थता दाखवल्याप्रकरणी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल
श्रीगोंद्यातील कोथूळ शिवारात तरुणाची हत्या

मुंबई : बॉलिवूड, टेलिव्हिजन आणि भोजपुरी सिनेसृष्टीत आपल्या दमदार अभिनयानं वेगळी ओळख निर्माण केलीय. पण, अभिनेत्री आकांक्षा पुरीला खरी ओळख मिळाली ती, ‘बिग बॉस’ हिंदीमुळे. बऱ्याचदा मागचा-पुढचा कोणताही विचार न करता केलेल्या वक्तव्यामुळे आकांक्षाला ट्रोलिंगचा सामना करावा लागलेला. पण, आता सध्या ती तिच्या आऊटफिटमुळे चर्चेत आहे. नुकत्याच एका फॅशन वीकमध्ये आकांक्षा पुरी हिनं पैठणी साडी वेअर केलेली, पण त्यावर तिनं कोणताही पारंपारिक साज परिधान करण्याऐवजी बिकनी ब्लाउज वेअर केलेला. त्यामुळे ती प्रचंड ट्रोल झाली. पैठणी म्हणजे, महाराष्ट्राचं महावस्त्र आणि आकांक्षा पुरीनं महाराष्ट्राचा आणि महाराष्ट्राच्या महावस्त्राचा अपमान केल्याचा आरोप तिच्यावर करण्यात आला. तसेच, तिला सोशल मीडियावर जोरदार ट्रोलही करण्यात आलं.

‘फॅशन वीक’मध्ये पैठणी साडीवर बिकिनी स्टाइलचा ब्लाउज परिधान केल्यामुळे अभिनेत्री आकांक्षा पुरी चांगलीच चर्चेत आली. तिच्या या बोल्ड लूकवरून सोशल मीडियावर मोठा वाद निर्माण झाला. मात्र, या टीकेला उत्तर दिलंय. आकांक्षा पुरीनं ट्रोल्सना सडेतोड उत्तर दिलंय.

पैठणीवरुन झालेल्या ट्रोलिंगवर आकांक्षा पुरी काय म्हणाली?

आकांक्षानं पैठणीवरुन झालेल्या वादावर बोलताना म्हटलंय की, ‘फॅशन वीक’मधला तिचा हा लूक पूर्णपणे डिझायनरच्या संकल्पनेवर आधारित होता आणि त्यात तिचा वैयक्तिक हस्तक्षेप नव्हता. ‘बॉम्बे टाइम्स फॅशन वीक’मध्ये तिनं ही स्टाइल कॅरी केली होती. ज्येष्ठ डिझायनर रोहित वर्मा यांच्या शोमध्ये आकांक्षा गेस्ट म्हणून सहभागी झालेली. या कार्यक्रमात तिनं पारंपरिक महाराष्ट्रीयन पैठणी साडी नेसली होती, पण साडीपेक्षा तिच्या ब्लाउजनंच सगळ्यांचं अधिक लक्ष वेधून घेतलं आणि त्यावरच जास्त चर्चा रंगली.

COMMENTS