भातकुडगाव फाटा : संतांनी घालून दिलेल्या विचारांनी परमार्थ प्राप्तीसाठी भगवंताच्या चरणी लीन होऊन भक्ती केली तरच भगवंतच्या जवळ जाता येते. समाज जागृतीचे महान कार्य करताना समाजाला अज्ञानातून बाहेर काढण्यासाठी संतानी अनमोल अशी ग्रंथ संपदा निर्माण केली आहे. त्याच प्रेरणादायी विचारांनी आपण भक्तिमार्गात आलं पाहिजे, परमार्थात शुद्ध भक्ती आचार विचारांना फार महत्त्व आहे.ते आपण जपले पाहिजे असे मत भागवताचार्य गहिनीनाथ महाराज आढाव यांनी मांडले. शेवगाव-नेवासा राज मार्गावरील भायगाव येथे देवगड संस्थानचे महंत शांतीब्रह्म भास्करगिरीजी महाराज, स्वामी प्रकाशानंदगिरी महाराज व वेदांताचार्य देविदास महाराज म्हस्के शास्त्री यांच्या प्रेरणेने श्री नवनाथ बाबाच्या प्रांगणात संपन्न होत असलेल्या ५८ व्या अखंड हरिनाम सप्ताहात पहिले पुष्प गुंफताना गहिनीनाथ महाराज बोलत होते. यावेळी अविनाश महाराज लोखंडे, महेश महाराज शेळके, भाऊसाहेब महाराज शेकडे, मल्हारी महाराज परभणे, भायगावचे सरपंच राजेद्र आढाव, जनार्धन लांडे, हरिचंद्र आढाव, बाळासाहेब दुकळे, केशव आढाव, बापुराव दुकळे, रामनाथ आढाव, अशोक दुकळे, संजय लांडे, सुदाम खंडागळे, गणपत आढाव, शिवाजी लांडे, पांडुरंग आढाव, एकनाथ लांडे, एकनाथ दुकळे, विष्णू घाडगे, विष्णू आढाव, कैलास लांडे, आदिनाथ लांडे, गंगाराम नेव्हल, नवनाथ शकडे, गंगाराम पवार, ज्ञानदेव नेव्हल, डॉ.बबन शेळके, उमाजी शेकडे, पोपट लोखंडे, कडुबाळ आढाव, उद्धव लांडे, पंढरीनाथ आढाव, अशोक शहाणे, पत्रकार शहाराम आगळे यांच्यासह भायगाव परिसरातील नागरिक व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. कीर्तनानंतर महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.

भातकुडगाव फाटा : संतांनी घालून दिलेल्या विचारांनी परमार्थ प्राप्तीसाठी भगवंताच्या चरणी लीन होऊन भक्ती केली तरच भगवंतच्या जवळ जाता येते. समाज जागृतीचे महान कार्य करताना समाजाला अज्ञानातून बाहेर काढण्यासाठी संतानी अनमोल अशी ग्रंथ संपदा निर्माण केली आहे. त्याच प्रेरणादायी विचारांनी आपण भक्तिमार्गात आलं पाहिजे, परमार्थात शुद्ध भक्ती आचार विचारांना फार महत्त्व आहे.ते आपण जपले पाहिजे असे मत भागवताचार्य गहिनीनाथ महाराज आढाव यांनी मांडले.
शेवगाव-नेवासा राज मार्गावरील भायगाव येथे देवगड संस्थानचे महंत शांतीब्रह्म भास्करगिरीजी महाराज, स्वामी प्रकाशानंदगिरी महाराज व वेदांताचार्य देविदास महाराज म्हस्के शास्त्री यांच्या प्रेरणेने श्री नवनाथ बाबाच्या प्रांगणात संपन्न होत असलेल्या ५८ व्या अखंड हरिनाम सप्ताहात पहिले पुष्प गुंफताना गहिनीनाथ महाराज बोलत होते.
यावेळी अविनाश महाराज लोखंडे, महेश महाराज शेळके, भाऊसाहेब महाराज शेकडे, मल्हारी महाराज परभणे, भायगावचे सरपंच राजेद्र आढाव, जनार्धन लांडे, हरिचंद्र आढाव, बाळासाहेब दुकळे, केशव आढाव, बापुराव दुकळे, रामनाथ आढाव, अशोक दुकळे, संजय लांडे, सुदाम खंडागळे, गणपत आढाव, शिवाजी लांडे, पांडुरंग आढाव, एकनाथ लांडे, एकनाथ दुकळे, विष्णू घाडगे, विष्णू आढाव, कैलास लांडे, आदिनाथ लांडे, गंगाराम नेव्हल, नवनाथ शकडे, गंगाराम पवार, ज्ञानदेव नेव्हल, डॉ.बबन शेळके, उमाजी शेकडे, पोपट लोखंडे, कडुबाळ आढाव, उद्धव लांडे, पंढरीनाथ आढाव, अशोक शहाणे, पत्रकार शहाराम आगळे यांच्यासह भायगाव परिसरातील नागरिक व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. कीर्तनानंतर महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.

COMMENTS