घोडेगाव : महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेल्या घोडेश्वरी मातेचा यात्रा उत्सव शनिवार (दि. ४ एप्रिल २०२६) पासून सुरू होत असून हा उत्सव सहा दिवस चालणार आह

घोडेगाव : महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेल्या घोडेश्वरी मातेचा यात्रा उत्सव शनिवार (दि. ४ एप्रिल २०२६) पासून सुरू होत असून हा उत्सव सहा दिवस चालणार आहे. या कालावधीत
शनिवार (दि. ४) रोजी रात्री ९ वाजता संगीत अलंकार रत्न ह.भ.प. कविराज महाराज झावरे (पारनेर) यांचे जाहीर कीर्तन होणार आहे. रविवारी (दि. ५) ह.भ.प. प्रल्हाद महाराज कळमसरे (पाचोरा, जळगाव) यांचे हरिकीर्तन होईल. सोमवारी (दि. ६) समाज प्रबोधनकार ह.भ.प. निवृत्ती महाराज देशमुख इंदुरीकर यांचे कीर्तन होणार आहे.
मंगळवारी (दि. ७) पहाटे ५ वाजता कावडी मिरवणूक व गंगास्नान, सकाळी ९.३० वाजता घोडेश्वरी देवीची महाआरती व प्रसाद वाटप, तर सायंकाळी ७.३० वाजता पालखी मिरवणूक व भव्य छबिना होणार आहे. यानंतर शोभेच्या दारूकामाचा कार्यक्रम होईल. रात्री १० वाजता खानदेश रत्न आनंद महाजन (जळगाव) यांचा लोकनाट्य तमाशा सादर केला जाणार आहे.
बुधवारी (दि. ८) सकाळी ८ ते ११ या वेळेत देवहजरीचा कार्यक्रम होईल. दुपारी ४ वाजता जंगी हंगामा आयोजित करण्यात आला असून रात्री ९ ते १ या वेळेत पद्मश्री पुरस्कार विजेते मास्टर रघुवीर खेडकर व कांताबाई सातारकर यांचा लोकनाट्य तमाशा होणार आहे.
गुरुवारी (दि. ९) सकाळी ८ ते ९ या वेळेत देणगीदारांचा सत्कार होईल. त्यानंतर ९ ते १ दरम्यान रघुवीर खेडकर व कांताबाई सातारकर यांचा देवहजरी कार्यक्रम होणार आहे. रात्री ९ वाजता घोडेश्वरी नाट्यकला अकॅडमी, घोडेगाव यांच्यातर्फे ‘माहेरची पाहुणी’ हे विनोदी नाट्यपुष्प सादर केले जाणार आहे. भाविकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन यात्रेची शोभा वाढवावी, असे आवाहन यात्रा समितीने केले आहे.

COMMENTS