Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

सोलर योजनेत शेतकऱ्याची फसवणूक

खरवंडी कासार : पाथर्डी तालुक्यातील ढाकणवाडी येथील शेतकरी नवनाथ रावसाहेब ढाकणे यांची सोलर पंप योजनेत फसवणूक झाल्याचा प्रकार समोर आला आहे. सीआयआर स

पिकांचे सरसकट पंचनामे करून मदत द्यावी; शेतकरी संघटनांची मागणी; तहसीलदारांना निवेदन
गुरुकुलमध्ये आधुनिक संगणक लॅबचे उद्घाटन 
गोदावरी संवर्धनासाठी सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय;नदी पुनरुज्जीवन प्राधिकरण स्थापन; कोपरगावात २० कोटींच्या कामांना गती

खरवंडी कासार : पाथर्डी तालुक्यातील ढाकणवाडी येथील शेतकरी नवनाथ रावसाहेब ढाकणे यांची सोलर पंप योजनेत फसवणूक झाल्याचा प्रकार समोर आला आहे. सीआयआर सोलर कंपनीकडून शासनाच्या अनुदानावर बसविण्यात आलेला तीन एचपीचा सोलर पंप अतिवृष्टीत खराब झाल्यानंतरही कंपनीने त्याची दखल न घेतल्याचा आरोप शेतकऱ्याने केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ढाकणे यांनी सोलर पंप खराब झाल्यानंतर पंचनामा करून संबंधित कंपनीकडे तक्रार नोंदवली होती. मात्र वारंवार पाठपुरावा करूनही कंपनीकडून कोणतीही कार्यवाही करण्यात आली नसल्याचे त्यांनी सांगितले. उलट कंपनीच्या कर्मचाऱ्यांकडून उडवाउडवीची उत्तरे दिली जात असल्याने शेतकऱ्याला मोठा मानसिक त्रास सहन करावा लागत आहे.

तसेच कंपनीकडून सोलर बसविताना जास्त पैसे घेतले जात असल्याचा आरोपही करण्यात आला असून यामुळे शेतकऱ्यांवर अतिरिक्त आर्थिक भार पडत असल्याचेही समोर आले आहे. या प्रकारामुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.

दरम्यान, या प्रकरणात योग्य ती कार्यवाही न झाल्यास संबंधित कंपनीविरोधात उपोषण आंदोलन छेडण्याचा इशारा शेतकरी नवनाथ ढाकणे यांनी दिला आहे.

COMMENTS