Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

रिपब्लिकन सेना बीड लोकसभा क्षेत्र प्रमुखपदी पुरुषोत्तम (गोटू) वीर यांची  निवड

बीड : रिपब्लिकन सेनेचे सरसेनानी आनंदराज आंबेडकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यभर पक्षबांधणीला गती देण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात

Beed : श्री गुरु चंद्रशेखर शिवाचार्यांची रुद्र प्रशिक्षण पाठशाळा बहरली (Video)
Beed: न्यायालयाच्या वतीने आजादी का अमृत महोत्सव साजरा (Video)
श्रीक्षेत्र गोरक्षनाथ टेकडी येथे गोविंद महाराज नाईकवाडे यांचे कीर्तन

बीड : रिपब्लिकन सेनेचे सरसेनानी आनंदराज आंबेडकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यभर पक्षबांधणीला गती देण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय व्यापक संवाद बैठकीत बीड लोकसभा क्षेत्र प्रमुखपदी पुरुषोत्तम (गोटू) वीर यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. ही बैठक दिनांक 29 रोजी शासकीय विश्रामगृह, बीड येथे रिपब्लिकन सेनेचे युवा नेतृत्व विजय दादा साळवे यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली.
या निवडीमुळे बीड जिल्ह्यातील पक्ष संघटनाला नवसंजीवनी मिळणार असल्याचे मत उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले. नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष डॉ. सुशिल सूर्यवंशी तसेच विजय दादा साळवे यांच्या हस्ते पुरुषोत्तम (गोटू) वीर यांना अधिकृत नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले. यावेळी वीर यांनी पक्षाच्या विचारसरणीला जनतेपर्यंत पोहोचवून संघटना अधिक बळकट करण्याचा निर्धार व्यक्त केला. कार्यक्रमात नवनिर्वाचित महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष डॉ. सुशिल सूर्यवंशी यांचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते भव्य सत्कार करण्यात आला. तसेच बीड जिल्ह्यातील माजलगाव, परळी, अंबाजोगाई, केज, किल्ले धारूर, शिरूर, आष्टी, गेवराई आणि पाटोदा या विविध तालुक्यांतील शेकडो कार्यकर्त्यांनी रिपब्लिकन सेनेत जाहीर पक्षप्रवेश करून पक्षाची ताकद वाढवली. त्यामध्ये निकेश बनसोडे व राहूल शिरोळे यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह पक्ष प्रवेश केला. बैठकीदरम्यान जिल्ह्यातील प्रत्येक तालुका तसेच गावागावात पक्षाच्या शाखा स्थापन करून संघटन अधिक मजबूत करण्याचा ठोस संकल्प करण्यात आला असून यामुळे आगामी काळात रिपब्लिकन सेनेचे जाळे तळागाळापर्यंत पोहोचवण्यावर भर दिला जाणार असल्याचे वीजय दादा साळवे यांनी सांगितले. कार्यक्रमाचे निवेदक इनकर सर यांनी व्यवस्थित मांडले तर आभार प्रदर्शन प्रा.गव्हाणे यांनी केले. या बैठकीस राहूल गवळी, शुद्धोधन मोरे, पंडित ओव्हाळ, वशिष्ठ लांडगे, विश्वनाथ तोडके, वैजनाथ गडशिंग, भुषण लोळगे, राहुल सिरसट, सय्यद अन्वर, अनिल डोंगरे, भुषण काकडे, लक्ष्मण गव्हाणे, रंजीत वाघमारे, शेख युनुस, निलेश ससाणे, रोहित वीर, बाळू वीर, संतोष सोनकांबळे, विशाल ससाणे, यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व विविध घटकांतील प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

COMMENTS