Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

 जवाहर विद्यालयाचे नवोदय परीक्षेत यश

चांदा : अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या जवाहर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, चांदा येथील विद्यार्थिनी स्वराली अनिल दहातोंडे हिने जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा २०२५-२६ मध्ये ८८.७५ टक्के गुण मिळवत गुणवत्ता यादीत स्थान मिळवले. तिची जवाहर नवोदय विद्यालय टाकळी ढोकेश्वर येथे निवड झाली असून विद्यालयातील इतर २० विद्यार्थी पात्र झाले आहेत.    नुकताच विद्यालयात या यशस्वी विद्यार्थ्यांचा गुण गौरव सोहळा सरपंच रावसाहेब दहातोंडे, चांदा सोसायटीचे माजी चेअरमन एकनाथ जावळे, शालेय व्यवस्थापन समिती उपाध्यक्ष किरण जावळे यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला. यावेळी नवोदय परीक्षा प्रमुख युवरा गायकवाड, रुख्मिणी सोनवणे, फरिदा पठाण, अनिता भांड-राशिनकर, स्वाती दळवी, अश्विनी दहातोंडे, शरयू मरडे, अर्चना निराळे, स्वप्निल मालवंडे, अनंत शेळके, प्रणित कोडम आदींचा सन्मान करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर माजी सरपंच रमेश दहातोंडे, शरद दहातोंडे,अरुण  दहातोंडे, ऍड.जनार्दन दहातोंडे, राहुल दहातोंडे,भारत दहातोंडे, भाऊराव दहातोंडे, अंबिका दहातोंडे, अनिल दहातोंडे, प्राचार्य अंशुमन वाकचौरे, उपप्राचार्य रघुनाथ भोजने, पर्यवेक्षक राजेश शेंडगे, ज्येष्ठ शिक्षक अर्जुन वैरागर, बबन घोडे यांसह सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन प्रसिद्धी विभाग प्रमुख प्रा. रावसाहेब राशिनकर व रोशन सरोदे यांनी केले तर ज्येष्ठ शिक्षक संजय ढेरे यांनी उपस्थितांचे आभार मानले.  या यशाबद्दल संस्था कार्यकारिणी सदस्य डॉ.दीपक शिंदे, नानासाहेब अंबाडे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष कैलास दहातोंडे व सर्व पदाधिकारी व ग्रामस्थ यांच्याकडून अभिनंदन होत आहे.

कोपरगावात नालेसफाईचा प्रश्न गंभीर : साबळे
श्री अगस्ति ऋषी आश्रमात कीर्तन महोत्सव 
शिवसेना जात-धर्मापलीकडे काम करणारा पक्ष : बाफना  उपमुख्यमंत्री शिंदेंच्या माध्यमातून रुग्णास दोन लाखाची मदत

चांदा : अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या जवाहर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, चांदा येथील विद्यार्थिनी स्वराली अनिल दहातोंडे हिने जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा २०२५-२६ मध्ये ८८.७५ टक्के गुण मिळवत गुणवत्ता यादीत स्थान मिळवले. तिची जवाहर नवोदय विद्यालय टाकळी ढोकेश्वर येथे निवड झाली असून विद्यालयातील इतर २० विद्यार्थी पात्र झाले आहेत.

   नुकताच विद्यालयात या यशस्वी विद्यार्थ्यांचा गुण गौरव सोहळा सरपंच रावसाहेब दहातोंडे, चांदा सोसायटीचे माजी चेअरमन एकनाथ जावळे, शालेय व्यवस्थापन समिती उपाध्यक्ष किरण जावळे यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला. यावेळी नवोदय परीक्षा प्रमुख युवरा गायकवाड, रुख्मिणी सोनवणे, फरिदा पठाण, अनिता भांड-राशिनकर, स्वाती दळवी, अश्विनी दहातोंडे, शरयू मरडे, अर्चना निराळे, स्वप्निल मालवंडे, अनंत शेळके, प्रणित कोडम आदींचा सन्मान करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर माजी सरपंच रमेश दहातोंडे, शरद दहातोंडे,अरुण  दहातोंडे, ऍड.जनार्दन दहातोंडे, राहुल दहातोंडे,भारत दहातोंडे, भाऊराव दहातोंडे, अंबिका दहातोंडे, अनिल दहातोंडे, प्राचार्य अंशुमन वाकचौरे, उपप्राचार्य रघुनाथ भोजने, पर्यवेक्षक राजेश शेंडगे, ज्येष्ठ शिक्षक अर्जुन वैरागर, बबन घोडे यांसह सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन प्रसिद्धी विभाग प्रमुख प्रा. रावसाहेब राशिनकर व रोशन सरोदे यांनी केले तर ज्येष्ठ शिक्षक संजय ढेरे यांनी उपस्थितांचे आभार मानले.  या यशाबद्दल संस्था कार्यकारिणी सदस्य डॉ.दीपक शिंदे, नानासाहेब अंबाडे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष कैलास दहातोंडे व सर्व पदाधिकारी व ग्रामस्थ यांच्याकडून अभिनंदन होत आहे.

COMMENTS