Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

भगवानगड परिसरात वीज पडून शेतकऱ्याचा मृत्यू  

खरवंडी कासार : भगवानगड परिसरात झालेल्या अवकाळी पावसादरम्यान वीज कोसळून एका शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. शिवाजी रघुनाथ खेडकर असे मृत शेतकऱ्याचे नाव असून, त्यांच्या पाळीव कुत्र्याचाही जागीच मृत्यू झाला.  मिळालेल्या माहितीनुसार, शिवाजी खेडकर हे शेतात काम करत असताना अचानक वादळी वाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली. त्याचवेळी विजेच्या कडकडाटात त्यांच्या अंगावर वीज कोसळल्याने ते गंभीर जखमी झाले. स्थानिक नागरिकांनी तातडीने त्यांना दवाखान्यात दाखल केले; मात्र डॉक्टरांनी तपासणीअंती त्यांना मृत घोषित केले. घटनेची माहिती मिळताच प्रशासनाने किर्तनवाडी परिसरात जाऊन पंचनामा सुरू केला. कुटुंबातील कर्ता व्यक्ती गमावल्याने खेडकर कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.  दरम्यान, भगवानगड परिसरासह पंचक्रोशीतील अनेक गावांना अवकाळी पावसाचा मोठा फटका बसला असून मका, बाजरी, कांदा आदी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. गारपिटीमुळे ही पिके भुईसपाट झाली आहेत. पुढील चार ते पाच दिवसांत अवकाळी पावसाची शक्यता वर्तविण्यात आल्याने शेतकऱ्यांनी शेतीची कामे दुपारपूर्वी पूर्ण करून आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. 

जवळवाडीत यात्रोत्सवानिमित्त कुस्त्यांचा हंगामा
जय हनुमान संस्थानच्या महंतपदी केशव शास्त्री
भगवान गडाच्या नारळी सप्ताहासाठी विशेष बस सेवा

खरवंडी कासार : भगवानगड परिसरात झालेल्या अवकाळी पावसादरम्यान वीज कोसळून एका शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. शिवाजी रघुनाथ खेडकर असे मृत शेतकऱ्याचे नाव असून, त्यांच्या पाळीव कुत्र्याचाही जागीच मृत्यू झाला.

 मिळालेल्या माहितीनुसार, शिवाजी खेडकर हे शेतात काम करत असताना अचानक वादळी वाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली. त्याचवेळी विजेच्या कडकडाटात त्यांच्या अंगावर वीज कोसळल्याने ते गंभीर जखमी झाले. स्थानिक नागरिकांनी तातडीने त्यांना दवाखान्यात दाखल केले; मात्र डॉक्टरांनी तपासणीअंती त्यांना मृत घोषित केले. घटनेची माहिती मिळताच प्रशासनाने किर्तनवाडी परिसरात जाऊन पंचनामा सुरू केला. कुटुंबातील कर्ता व्यक्ती गमावल्याने खेडकर कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

 दरम्यान, भगवानगड परिसरासह पंचक्रोशीतील अनेक गावांना अवकाळी पावसाचा मोठा फटका बसला असून मका, बाजरी, कांदा आदी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. गारपिटीमुळे ही पिके भुईसपाट झाली आहेत.

पुढील चार ते पाच दिवसांत अवकाळी पावसाची शक्यता वर्तविण्यात आल्याने शेतकऱ्यांनी शेतीची कामे दुपारपूर्वी पूर्ण करून आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. 

COMMENTS