अहिल्यानगर : नाशिकमध्ये उघडकीस आलेल्या भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणाच्या तपासात धक्कादायक बाबी समोर येत आहेत. विशेष तपास पथकाकडून सुरू असलेल्या चौक

अहिल्यानगर : नाशिकमध्ये उघडकीस आलेल्या भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणाच्या तपासात धक्कादायक बाबी समोर येत आहेत. विशेष तपास पथकाकडून सुरू असलेल्या चौकशीचा अंतिम टप्पा जवळ आला असून, आरोपीने महिलांवर अत्याचार केल्यानंतर त्यांना गर्भधारणा होऊ नये म्हणून काही औषधांचा वापर केला असावा, असा गंभीर संशय तपास यंत्रणांनी व्यक्त केला आहे., यासोबतच खरात पोलिस कोठडी मंगळवारी संपली असून त्याला आज बुधवारी न्यायालयासमोर हजर केले जाणार असून तपास यत्रंणेकडून पोलिस कोठडी वाढवून देण्याची मागणी करणार असल्याचे समजते.
न्यायालयाने दिलेल्या पोलीस कोठडीत आरोपीची सलग चौकशी सुरू आहे. या दरम्यान तपास पथकाने अनेक महत्त्वाचे धागेदोरे गोळा केले आहेत. आरोपीने अनेक महिलांना जाळ्यात ओढून त्यांच्यावर अत्याचार केल्याचे समोर आले असले, तरी त्यापैकी कोणतीही महिला गर्भवती झाल्याचे आढळले नाही. ही बाब लक्षात घेता, गर्भधारणा टाळण्यासाठी काही औषधे देण्यात आली असावीत, असा संशय अधिक बळावत आहे. या पार्श्वभूमीवर नाशिकमधील काही डॉक्टरांच्या भूमिकेचीही चौकशी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. संबंधित महिलांना आरोपीकडून औषधे दिली जात होती का, ती औषधे वैद्यकीय सल्ल्याने दिली होती का, तसेच त्या औषधांचा नेमका उद्देश काय होता, याचा तपास सुरू आहे. याशिवाय महिलांना संमोहनासारख्या स्थितीत नेण्यासाठीही काही औषधांचा वापर करण्यात आला होता का, याचीही पडताळणी केली जात आहे. तपासादरम्यान आरोपी चौकशीत सहकार्य करत नसल्याचेही समोर आले आहे. विशेषतः अत्याचारांच्या संदर्भातील प्रश्नांवर तो टाळाटाळ करीत असल्याचे अधिकार्यांनी न्यायालयात नमूद केले आहे. त्यामुळे उपलब्ध पुराव्यांच्या आधारे सत्य बाहेर काढण्याचे आव्हान तपास पथकासमोर आहे. आरोपीच्या मोबाईलमधील माहिती पुनर्प्राप्त करून तिचे विश्लेषण करण्यात येत आहे. संपर्क क्रमांक, संवाद आणि इतर डिजिटल नोंदींची तपासणी सुरू असून, त्यातून नव्या व्यक्तींचा व व्यवहारांचा उलगडा होण्याची शक्यता आहे. काही महत्त्वाचे क्रमांक सांकेतिक पद्धतीने नोंदवले असल्याचेही प्राथमिक तपासात दिसून आले आहे.
आणखी काही व्यक्तींचा सहभाग वाढण्याची शक्यता
आर्थिक व्यवहारांची छाननीही समांतरपणे सुरू असून, या प्रकरणात आणखी काही व्यक्तींचा सहभाग उघड होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तपास पथक पुढील काही दिवसांत न्यायालयासमोर अधिक ठोस पुरावे मांडण्याच्या तयारीत आहे. या प्रकरणामुळे समाजात मोठी खळबळ उडाली असून, अशा घटनांवर कठोर कारवाईची मागणी नागरिकांकडून होत आहे. अंधश्रद्धा आणि भोंदूपणाच्या आडून घडणार्या गुन्ह्यांवर आळा घालण्यासाठी यंत्रणांनी अधिक सजग राहण्याची गरज अधोरेखित झाली आहे.

COMMENTS