Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

नॅशनल टेक्नीकल स्टुडंट्स असोसिएशन (एनटीएसए) च्या महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्षपदी अनिल  धमने

नांदेड : नॅशनल टेक्नीकल स्टुडंट्स असोसिएशन(एनटीएसए) या विद्यार्थी संघटनेच्या महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्षपदी अनिल  धमने यांची निवड करण्यात आली

देगलूरमध्ये खळबळ : नगराध्यक्षा व कुटुंबीयांवर जुगार क्लब चालवण्याचे आरोप; अज्ञात पॅम्पलेट व्हायरल
नांदेडसह हिंगोली जिल्ह्यात भूकंपाचे धक्के 4.7 रिश्टर तीव्रता, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
कृषि विभागाची धडक कारवाईविनापरवाना बीटी कापुस बियाणे विक्री प्रकरणी गुन्हा दाखल

नांदेड : नॅशनल टेक्नीकल स्टुडंट्स असोसिएशन(एनटीएसए) या विद्यार्थी संघटनेच्या महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्षपदी अनिल  धमने यांची निवड करण्यात आली आहे. त्यांच्या दीर्घ सामाजिक, शैक्षणिक व संघटनात्मक कार्याची दखल घेऊन ही नियुक्ती करण्यात आली.
गेल्या तब्बल 28 वर्षांपासून विविध राजकीय व सामाजिक संघटनांमध्ये कार्यरत असलेल्या अनिल धमने यांना विविध क्षेत्रातील दांडगा अनुभव आहे. त्यांच्या उल्लेखनीय कार्याचा गौरव करत एनटीएसए चे संस्थापक अध्यक्ष हिटलर भोसले यांच्या आदेशानुसार, प्रदेशाध्यक्ष भास्कर हंबर्डे यांच्या हस्ते त्यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले.  धमने यांनी 1998 पासून शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस, महात्मा फुले समता परिषद तसेच ओबीसी संघर्ष समितीमध्ये विविध पदांवर कार्य केले आहे. ते सध्या शिवसेना ओबीसी जिल्हाप्रमुख, व्हॉईस ऑफ मीडिया पत्रकार संघाचे मुख्य सचिव म्हणून कार्यरत असून, पत्रकारितेतही त्यांना सुमारे 15 वर्षांचा अनुभव आहे.  दै. जिल्हा प्रतिनिधी म्हणून काम पाहत आहेत. दि. 27 मार्च रोजी नांदेड येथील हॉटेल  (जुना कौठा) येथे आयोजित छोटेखानी कार्यक्रमात ही नियुक्ती जाहीर करण्यात आली. यावेळी मराठवाडा अध्यक्ष शंकर धिरडीकर, कायदेशीर सल्लागार ड. चंद्रप्रकाश सांगवीकर, नांदेड दक्षिण जिल्हाध्यक्ष शिलानंद सोनकांबळे व नांदेड उत्तर जिल्हाध्यक्ष राम पाटील मुदखेडे यांच्यासह पदाधिकार्‍यांची उपस्थिती होती. नियुक्तीपत्रात संघटनेची उद्दिष्टे स्पष्ट करण्यात आली असून, विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक अडचणी दूर करणे, त्यांना उद्योजकतेकडे वळवणे, तसेच सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, औद्योगिक व क्रीडा क्षेत्रात प्रोत्साहन देणे यावर भर देण्यात आला आहे. ही संघटना राजकीय नसून विद्यार्थी विकास व संगोपनासाठी कार्यरत राहणार असल्याचे नमूद करण्यात आले आहे. याशिवाय बेरोजगारांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे व भटक्या-विमुक्त, मागासवर्गीय तसेच बहुजन समाजातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक न्याय मिळवून देणे हेही प्रमुख उद्दिष्ट आहे. दरम्यान, अनिल धमने यांच्या या निवडीबद्दल सामाजिक, राजकीय, शासकीय क्षेत्रासह मित्रपरिवाराकडून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.

COMMENTS