शिवसेनेच्या चिन्हावर 16 जुलैला सुनावणी

Homeताज्या बातम्या

शिवसेनेच्या चिन्हावर 16 जुलैला सुनावणी

नवी दिल्ली ः शिवसेना उबाठा गटाने सर्वोच्च न्यायालयात पक्षाच्या निवडणूक चिन्हाबाबत सुरू असलेल्या प्रकरणाची सुनावणी लवकर घेण्याची मागणी केली आहे. स्थान

५ वर्षे जुन्या प्रकरणात नितेश राणे यांना शिक्षा; न्यायालयाकडून स्थगिती!
मॅच आधीच कर्णधार बाबर आझम बॅकफूटवर
खासदार उदयनराजे भोसले आज रायगडावर मोठा निर्णय घेणार असल्याचा इशारा


नवी दिल्ली ः शिवसेना उबाठा गटाने सर्वोच्च न्यायालयात पक्षाच्या निवडणूक चिन्हाबाबत सुरू असलेल्या प्रकरणाची सुनावणी लवकर घेण्याची मागणी केली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमुळे ही सुनावणी आवश्यक असल्याचे उद्धवसेनेच्या वकिलांनी सांगितले. परंतू, सर्वोच्च न्यायालयाने त्यावर त्वरित सुनावणी घेण्यास नकार दिला असून येत्या 16 जुलै रोजी नियमित खंडपीठासमोरचा हा विषय मांडला जाईल, असे सांगितले.


उद्धवसेनेच्या वतीने ज्येष्ठ वकील देवदत्त कामत यांनी बुधवारी (दि.2) स्थानिक निवडणुकांचा हवाला देत पक्षाच्या निवडणूक चिन्हाबाबत लवकर सुनावणीची मागणी केली. या मागणीला विरोध करताना शिंदे गटाच्या वकिलांनी सांगितले की, निवडणूक चिन्ह वाटपानंतर 2 महत्त्वाच्या निवडणुका (लोकसभा आणि विधानसभा) झाल्या आहेत.

7 मे रोजी न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या अध्यक्षतेखालील नियमित खंडपीठासमोरही हीच मागणी करण्यात आली होती. यावेळी खंडपीठाने या प्रकरणाची लवकरच सुनावणी घेण्यास नकार दिला. आता पुन्हा एकदा सुट्टीतील खंडपीठासमोरही तोच प्रयत्न केला जात आहे. त्यावर उद्धव सेनेच्या वकिलांनी म्हटले की, ते राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार-अजित पवार वादात दिलेल्या व्यवस्थेची मागणी करत आहेत. यावर न्यायमूर्ती एमएम सुंदरेश यांच्या अध्यक्षतेखालील सुट्टीतील खंडपीठाने त्यांना 16 जुलै रोजीच आपला मुद्दा मांडण्यास सांगितले आहे.

COMMENTS