Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

जिल्हाधिकारी साहेब, अवकाळी पावसाने वाहून गेलेल्या पुलांची दुरुस्ती कधी?तत्कालीन पालकमंत्री अजितदादांनी मंजूर  केलेल्या निधीचं काय झालं? लिंबागणेश ते बोरखेड पुलाच्या दुरुस्तीची मागणी :- डॉ. गणेश ढवळे

बीड : सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे बीड जिल्ह्यातील अनेक रस्ते, नळकांडी पुल, तलाव व बंधारे वाहून गेले होते. त्यावेळी तत्कालीन पालकमंत्

आ. काळे व मंत्री आठवलेंचा एकत्रित विमान प्रवास
राष्ट्रीय महामार्ग मांजरसुंभा ते पाटोदा दरम्यान अपघात
आरक्षणाचा पेच आणि सरकारची कोंडी

बीड : सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे बीड जिल्ह्यातील अनेक रस्ते, नळकांडी पुल, तलाव व बंधारे वाहून गेले होते. त्यावेळी तत्कालीन पालकमंत्री अजित पवार यांनी जिल्हा प्रशासनाला तातडीने दुरुस्तीचे आदेश देत आपत्ती व्यवस्थापनांतर्गत मोठ्या प्रमाणावर निधी मंजूर केला होता. मात्र, या घटनेला सहा महिने उलटूनही अनेक ठिकाणी दुरुस्तीची कामे रखडलेली आहेत.
जिल्हा प्रशासनाच्या दिरंगाईमुळे ग्रामीण भागातील वाहतूक व्यवस्था विस्कळीत झाली असून नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर सामाजिक कार्यकर्ते डॉ. गणेश ढवळे (लिंबागणेशकर) यांनी मंजूर निधीचा उपयोग नेमका कधी होणार? आणि प्रत्यक्ष कामांना सुरुवात कधी होणार? असा सवाल उपस्थित केला आहे. बीड तालुक्यातील लिंबागणेश ते बोरखेड हा महत्त्वाचा रस्ता व पुल सप्टेंबरमधील पावसात वाहून गेला होता. या रस्त्यावरून वाणी वस्ती, घोलप वस्ती, गावडे वस्ती, ढवळे वस्ती, घरत वस्ती, मुळे वस्ती येथील नागरिकांचा दैनंदिन संपर्क आहे. भाजीपाला, दुग्ध व्यवसाय तसेच विद्यार्थ्यांच्या ये-जा यावर याचा मोठा परिणाम होत आहे. दि.30 सप्टेंबर रोजी डॉ. गणेश ढवळे यांच्या नेतृत्वाखाली तत्कालीन पालकमंत्री अजितदादा पवार यांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक करत लक्ष्यवेधी आंदोलन करण्यात आले होते. या आंदोलनाची दखल घेत पालकमंत्र्यांच्या आदेशानुसार जिल्हाधिकार्‍यांनी जिल्हा वार्षिक योजना (लेखाशिर्ष 3054-3121 – ग्रामीण रस्ते विकास योजना) अंतर्गत सन 2025-26 साठी 20 लाख रुपयांचा निधी मंजूर केला होता. कार्यकारी अभियंता बांधकाम विभाग क्र.1, जिल्हा परिषद बीड यांनी निविदा प्रक्रिया सुरू असल्याचे लेखी कळवले होते. मात्र, आजतागायत प्रत्यक्ष कामाला सुरुवात झालेली नाही. दरम्यान, रस्त्याची अवस्था दिवसेंदिवस अधिकच खराब होत असून आगामी पावसाळ्यापूर्वी तातडीने दुरुस्तीची कामे हाती घ्यावीत, अन्यथा नागरिकांना पुन्हा मोठ्या संकटाला सामोरे जावे लागेल, अशी मागणी डॉ. गणेश ढवळे यांनी केली आहे.

COMMENTS