चहाबाज नगरकर

Homeताज्या बातम्यासंपादकीय

चहाबाज नगरकर

भारतात ९९ टक्के नागरिकांची सकाळ ही चहाने सुरु होते. जवळपास प्रत्येकाचे दिवसभरात साधारण तीन चहा हमखास होतात. मित्र, नातेवाईक किंबहुना जवळचा कुणीही भेट

रंगभूमीचा खरा इतिहास
विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्‍न ऐरणीवर
राजकारणातील गाफीलपणा

भारतात ९९ टक्के नागरिकांची सकाळ ही चहाने सुरु होते. जवळपास प्रत्येकाचे दिवसभरात साधारण तीन चहा हमखास होतात. मित्र, नातेवाईक किंबहुना जवळचा कुणीही भेटला तर चहा पिणे हे आता सर्वांच्या अंगवळणी पडलेले आहे. अलीकडे पिण्याचे नवनवीन अनेक पेय आले आहेत. मात्र चहा आपले स्थान टिकवून आहे. चहामुळे भारतातील सर्वाधिक म्हणजे दोन नंबरच्या स्थानावर रोजगार मिळतो. यातून मोठी उलाढाल उलाढाल भारतात होते. भारताला मिळणाऱ्या एकूण परदेशी चलनाच्या पंधरा टक्के चलन चहा उद्योगातून मिळते. माणसाला चहाचे व्यसन हे लहान वयापासून कुटुंबामधूनच लागते. चहा पिणे शरीरासाठी फायद्याचे की तोट्याचे यावर फारसा कुणी विचार करत नाही. त्यावर विचार केला पाहिजे. अहमदनगर जिल्ह्यात चहा पिणाऱ्यांची संख्या मोठी आहे. त्यात चहाचे काही खास शौकीन असे आहेत की, चहा पिण्यासाठी आपल्या मानपसंतीच्या ठिकाणी जाण्यासाठी दिवसातून दोन- तीन चकरा हमखास मारतात. चहा सर्वचजण पितात पण चहाबद्दल कुणाला फारसे माहित देखील नसते. त्यामुळे चहाचा उहापोह करणे क्रमप्राप्त.

आपल्याकडे चहाचा शोध कुणी लावला याचा निश्चित पुरावा नाही. पण भारतात  एका बौद्ध भिक्षुने चहाचा शोध लावल्याची नोंद आहे. तर एका राजाची चहाचा शोध लावल्याची जातक कथा देखील आपल्याकडे रूढ आहे. चहा हे पेय तसे विदेशी आहे. आता स्वदेशीचा प्रचार करणारे रोज चहा पितात हे खरेच आहे. आपल्याकडे इंग्रजांनी  चहा आणला हे खरेच. मसाले विकण्यासाठी आलेल्या इंग्रजांनी चहा आणला आणि हा व्यापार  करत करत देशावर राज्य देखील केलं. याचाच दुसरा अर्थ असा की चहा पिता- पिता भारतीय लोक पारतंत्र्यात गेले. एवढी ताकत या चहामध्ये आहे. आजही कुठलाही व्यवहार करतांना सुरवातीला आणि शेवटी चहाशिवाय हा व्यवहार होत नाही. भारतातील चहाचा उद्योग हा १८७० च्या सुमारास चांगल्या प्रकारे विकासाच्या मार्गास लागला. १८८१ मध्ये इंडियन टी असोसिएशन आणि १९१८ मध्ये इंडियन टी प्लॅंटर्स असोसिएशन या संस्था स्थापन झाल्या आणि चहा विकसित होत गेले. भारतातील चहाची लागवड मुख्यत्वेकरून उ. व द. भारतातील डोंगराळ भागांत हेते. चहाच्या शेतीमधून मोठ्या प्रमाणावर लोकांना रोजगार मिळालेला आहे.  आसाम हा चहाच्या लागवडीमध्ये प्रथमपासून अग्रेसर प्रदेश. चहा हा भारतीय लोकांच्या पसंतीचे एक नंबरचे पेय आहे. आपल्याकडे सगळे लोक चहा पितात पण चहा कसा प्यावा याची शास्त्रीय पद्धत देखील या चहाबाज बहाद्दराना नसते. अती चहा पिणे हे शरीरासाठी घातकच आहे. नुसता चहाच नाही तर कुठलीही गोष्ट प्रमाणाच्या बाहेर करणे नुकसानदायकच असते. चहामध्ये कॅफिन असते, ज्यामुळे आपली मेंदूची शक्ती कमी होते आणि विचार करण्याची क्षमता कमकुवत होते. म्हणजे, तुम्हाला चहाचे व्यसन लागते आणि जोपर्यंत चहा मिळत नाही तोपर्यंत तुमचा मेंदू नीट काम करत नाही. असा त्याचा सिद्धांत आहे. बहुतेक लोकांना गरम चहा पिण्याची सवय असते. ज्यामुळे त्यांचा घसा, तोंड आणि पोट यांना जोडणारी नळी खराब होण्याचा धोका वाढू शकतो. यासोबतच जास्त चहा प्यायल्याने पोटात असे काही ऍसिड तयार होऊ लागतात, जे पोटात अल्सर वाढवतात. त्याचप्रमाणे पोटॅशियम, मॅग्नेशियमसारखे अनेक खनिजे शरीरातून बाहेर पडतात आणि हळूहळू शरीरात अशक्तपणा येऊ लागतो. याव्यतिरिक्त, चहात भरपूर फ्लोराइड देखील असते, ज्यामुळे हाडे कमकुवत होतात. आता चहा कमी  प्या किंबहुना पिऊ नये असा आपण सल्ला दिला तरी तो कुणी मनावर घेणार नाही. एका अभ्यासानुसार पुरुषांमध्ये सकाळी रिकाम्या पोटी चहा पिल्याने प्रोस्टेनट कैंसर मुळे वाढतो. त्यामुळे सकाळी खाली पोट चहा पिने हे व्यसन सोडणे अत्यावश्यक आहे. चहा पिण्याचे फायदे काय आहेत हे तपासले तर त्याचे शरीराला फारसे फायदे नाहीत. नैसर्गिक चहा पिणे तसे फायद्याचे मानले जाते. त्यामध्ये कैफिन आणि टैनिन असतो, जो शरीराला स्फुर्ती प्रदान करतो. अहमदनगर जिल्ह्यासह महाराष्ट्रात अलीकडे चहाचे नवनवीन प्रयोग केले जात आहेत. त्याला प्रतिसाद देखील भरपूर मिळत आहे. पण चहा हा जीवनावश्यक आहे का? यावरही विचार करणे गरजेचे आहे. तो चहाबाज नगरकरांनी करावा एवढेच.

COMMENTS