शेवगाव : तालुक्यातील प्रगतशील महिला शेतकरी कल्याणी मुरदारे (रा.भगुर, ता. शेवगाव) यांची ‘तिफण कृषी गौरव २०२५’ अंतर्गत ऍग्रीकल्चर एक्सलंन्स पुरस्क

शेवगाव : तालुक्यातील प्रगतशील महिला शेतकरी कल्याणी मुरदारे (रा.भगुर, ता. शेवगाव) यांची ‘तिफण कृषी गौरव २०२५’ अंतर्गत ऍग्रीकल्चर एक्सलंन्स पुरस्कारासाठी निवड जाहीर करण्यात आली. तिफण फाऊंडेशन यांच्या वतीने कृषी क्षेत्रात नाविन्यपूर्ण, प्रेरणादायी व उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शेतकऱ्यांना हा सन्मान प्रदान केला जातो.
मुरदारे यांनी शेतीत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, सेंद्रिय शेतीचा अवलंब आणि विविध प्रयोगांच्या माध्यमातून उल्लेखनीय प्रगती साधली आहे. त्यांनी आपल्या शेतीत विविध प्रकारच्या पिकांची लागवड करून उत्पादन क्षमता वाढवली असून हरित व शाश्वत शेतीचा आदर्श निर्माण केला आहे. त्यांच्या शेतात विविध फळझाडे, भाजीपाला व धान्य उत्पादन घेतले जात असून ‘शेतातून थाळीपर्यंत’ ही संकल्पना यशस्वीपणे राबवली जात आहे.
तसेच, त्यांनी गोपालन क्षेत्रातही विशेष कामगिरी करत दुग्ध उत्पादन वाढवले आहे. सेंद्रिय पद्धतीने तयार केलेल्या दुग्धजन्य पदार्थांमुळे त्यांना चांगला प्रतिसाद मिळत असून एकात्मिक शेतीचे प्रभावी मॉडेल त्यांनी उभे केले आहे. त्यांच्या या कार्यामुळे अनेक तरुण व महिला शेतकऱ्यांना प्रेरणा मिळत आहे. या पुरस्काराबाबत तिफण फाऊंडेशन कडून अधिकृत पत्र देण्यात आले आहे. या यशाबद्दल कल्याणी कैलास मुरदारे यांचे सर्वस्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे.

COMMENTS