उप अभियंता संजय भेंडेंचा 250 कोटींच्या निधीचा घोटाळा; यापूर्वी झालेल्या कामांवरच निधी खर्च दाखवत काढले बिले; शाखा अभियंता शिर्के आणि बकरे यांचा संगनमताने अपहार

Homeताज्या बातम्या

उप अभियंता संजय भेंडेंचा 250 कोटींच्या निधीचा घोटाळा; यापूर्वी झालेल्या कामांवरच निधी खर्च दाखवत काढले बिले; शाखा अभियंता शिर्के आणि बकरे यांचा संगनमताने अपहार

मुंबई : सार्वजनिक बांधकाम विभागातील बांद्रा पूर्व विभागातील उप अभियंता संजय भेंडे यांनी पुन्हा एकदा सार्वजनिक बांधकाम विभागाला चक्क वेड्यात काढत

जुन्या बसस्थानकाच्या विकासातून रोजगारनिर्मितीची मागण; आ. गर्जे यांचे परिवहन मंत्री सरनाईक यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी
खडकीत ‘रोजगार मंदिर’चा प्रारंभ
शेतकऱ्यांच्या बांधावरच न्याय निवाड्याचा ‘कोपरगाव पॅटर्न’; शेतशिवार रस्त्यांचे ७५ वाद ‘बांधावरच’ निकाली; ६० हून अधिक किमीचे रस्ते खुले
The current image has no alternative text. The file name is: images-19.jpg

मुंबई : सार्वजनिक बांधकाम विभागातील बांद्रा पूर्व विभागातील उप अभियंता संजय भेंडे यांनी पुन्हा एकदा सार्वजनिक बांधकाम विभागाला चक्क वेड्यात काढत झालेल्या कामांवरच पुन्हा एकदा नव्याने काम झाल्याचे दाखवत तब्बल 250 कोटींचा गैरव्यवहार करत मोठ्या रकमेचा अपहार केल्याचे दिसून येत आहे.
याप्रकरणी सविस्तर माहिती अशी की, उप अभियंता संजय भेंडे यांच्या अखत्यारीत येणार्‍या बांद्रा येथील निर्मलनगर पोलिस स्टेशन, सांताकुझ्र फॉरेन्सिक लॅब, कोषागार कार्यालय, भास्कर कोर्ट बांद्रा, वस्तू व सेवा कर कार्यालय बीकेसी, अन्न व औषध प्रशासन बीकेसी, त्यांच्या अखत्यारीत असून, याठिकाणी सुरू असलेल्या देखभाल आणि दुरूस्तीच्या नावाखाली उपअभियंता भेंडे यांनी एमओडब्ल्यू आणि डीपीडीसीच्या तसेच सीआर आणि एसएलआर आणि एसडीआर अंतर्गत झालेल्या कामांवरच पुन्हा नव्याने बोगस निविदा काढून, बोगस कामे झाल्याचे दाखवून तब्बल 250 कोटींचा गैरव्यवहार केला. याप्रकरणात त्यांना शाखा अभियंता शिर्के ज्यांच्याकडे फॅमिली कोर्ट असून, याठिकाणी देखील देखभाल दुरूस्तीच्या नावाखाली कोट्यावधींचा गैरव्यवहार करण्यात आला आहे. तसेच शाखा अभियंता अजिंक्य बकरे (जहांगीर) यांनी देखील या कामांमध्ये मोठा गैरव्यवहार केला आहे.
उप अभियंता संजय भेंडे यांनी शासकीय पॉलिटेक्निक बांद्रा येथील कामांमध्ये तसेच डीपीच्या कामांमध्ये 14 कोटी तर ब-टच्या नावाखाली 8 कोटींचे बोगस देयके अदा केली असून, यासोबतच बांद्रा हायकोर्टासाठी राखीव ठेवण्यात आलेल्या जागेतील कामं पाडण्याचे निर्देश असतांना त्याठिकाणी कामं सुरू केली आहेत, यातून शासकीय निधीचा गैरवापर, शासकीय निधीची लूट आणि अपहार प्रकरणी त्यांची चौकशी करण्याची मागणी दैनिक लोकमंथनकडून मुख्यमंत्री, सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि सार्वजनिक बांधकाम सचिव यांच्याकडे करण्यात आली आहे.

कार्यकारी अभियंता दिघावकर विरोधात
14 एप्रिलपासून करणार आमरण उपोषण
सार्वजनिक बांधकाम विभागातील अधीक्षक अभियंता बांधकाम मंडळ चेंबूर याठिकाणी कार्यरत असलेल्या कार्यकारी अभियंता दिघावकर यांच्या गैरव्यवहाराबाबत आणि त्यांनी केलेल्या नियमबाह्य कामांबाबत आम्ही सावर्र्जनिक बांधकाम विभाग आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना अवगत केले असून, त्यांची याप्रकरणात चौकशी होऊन कारवाई होणे अपेक्षित आहे, मात्र तसे न झाल्यास 14 एप्रिलपासून मी डॉ. अशोक सोनवणे मुंबईत आमरण उपोषण करणार आहे.

उप अभियंता शिंदेंनी केली 100 कोटींची नियमबाह्ये कामे
सार्वजनिक बांधकाम विभागातील बांद्रा वसाहत उपविभाग क्रमांक-3चे उप अभियंता शिंदे यांनी येथील नवीन इमारतींच्या 100 कोटींच्या कामांमध्ये गैरव्यवहार करत नियमावलीनुसार काम केलेले नाही. त्यांनी याप्रकरणातील कामांमध्ये तीन टप्प्यांमध्ये पैसे घेतले असून, शासकीय नियमांना पायदळी तुडवत, नियमबाह्य कामं केली आहेत, याप्रकरणी चौकशी होणे गरजेचे आहे.

COMMENTS