Homeताज्या बातम्याक्रीडा

‘आयसीसी’कडून क्रिकेटमधील सॉफ्ट सिग्नल नियम रद्द

’आयसीसी’च्या क्रिकेट नियम समितीचे अध्यक्ष सौरव गांगूलीकडून मान्यता

दुबई/वृत्तसंस्था : क्रिकेटमधील सॉफ्ट सिग्नलचा नियम अखेर संपणार आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने हा नियम आंतरराष्ट्रीय सामन्यांमधून रद्द करण्य

रोहित शर्माची अमेरिकेत क्रिकेट अकॅडमी
कोल्हापूरच्या अभिज्ञा हिस वर्ल्ड शूटिंग चॅम्पियनशिपमध्ये रौप्य पदक
विनेश फोगट आशियाई स्पर्धेतून बाहेर

दुबई/वृत्तसंस्था : क्रिकेटमधील सॉफ्ट सिग्नलचा नियम अखेर संपणार आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने हा नियम आंतरराष्ट्रीय सामन्यांमधून रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. विशेष बाब म्हणजे हा नियम 7 जूनपासून सुरू होणार्‍या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये लागू होणार नाही. लंडनमधील ओव्हल मैदानावर भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात डब्ल्यूटीसीची अंतिम लढत होणार आहे. आयसीसीने सॉफ्ट सिग्नल रद्द केल्याची माहिती आहे. या निर्णयाला सौरव गांगुलीने मान्यता दिल्याचे मानले जात आहे. ते आयसीसीच्या क्रिकेट नियम समितीचे अध्यक्ष आहेत. त्याच वेळी, सॉफ्ट सिग्नल समाप्त करण्याच्या निर्णयाची माहिती डब्ल्यूटीसी, भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही अंतिम स्पर्धकांना देण्यात आली आहे. ‘क्रिकबझ’च्या हवाल्याने ही बातमी समोर आली आहे. त्याचवेळी, ‘क्रिकबझ’च्या बातमीत अशीही माहिती देण्यात आली आहे की, भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील थढउ फायनलमध्ये जर मैदानातील नैसर्गिक प्रकाशाची स्थिती खराब असेल, तर फ्लडलाईट चालू करता येईल. लाईट सुरु करूनही जर सामना त्यादिवशी झाला नाही तर मात्र, या सामन्यासाठी राखीव दिवस सहावा दिवस ठेवला आहे.

क्रिकेटच्या अनेक दिग्गजांनी यापूर्वीच सॉफ्ट सिग्नल नियमाबाबत प्रश्‍न उपस्थित केले आहेत. त्याचवेळी अनेक माजी आणि सध्याच्या खेळाडूंनी हा नियम संपवण्याची मागणी केली होती. आधुनिक तंत्रज्ञानाने सज्ज असल्याने सॉफ्ट सिग्नलचा नियम काढून तिसर्‍या अंपायरनी याबाबत निर्णय घ्यावा, असे अनेक तज्ज्ञांनी सांगितले. इंग्लंडच्या कसोटी संघाचा कर्णधार बेन स्टोक्सनेही या वर्षाच्या सुरुवातीला या वादग्रस्त नियमावर प्रश्‍न उपस्थित केले होते. खरं तर, ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील कसोटी मालिकेदरम्यान, कांगारू संघाचा फलंदाज मार्नस लाबुशेनला सॉफ्ट सिग्नल म्हणून आऊट करण्यात आले होते. पण, स्लिपमध्ये पकडलेला झेल संशयास्पद वाटत होता. यानंतर असा युक्तिवाद केला जाऊ लागला की जेव्हा अंपायरला एखादा झेल वादग्रस्त दिसला, तेव्हा तो थर्ड अंपायरकडे का पाठवला गेला नाही? वास्तविक, या नियमामुळे स्टोक्सच्या संघाला गेल्या वर्षी पाकिस्तानविरुद्ध झालेल्या कसोटी सामन्यात फायदा झाला होता. पाकिस्तानचा फलंदाज सौद शकीलला अंपायरनी सॉफ्ट सिग्नल म्हणून आऊट दिले. सॉफ्ट सिग्नल नियमाचा वापर थर्ड अंपायर तेव्हा करतात, जेव्हा ते कोणत्याही निर्णयावर पोहोचू शकत नाहीत. एखादा झेल, किंवा कोणताही कठिण निर्णय देण्यासाठी फिल्ड अंपायर तो थर्ड अंपायरकडे पाठवतो. टीव्ही अंपायर निर्णय देण्यासाठी उपलब्ध सर्व तंत्रज्ञानाचा वापर करतात. यानंतरही जर टीव्ही अंपायर निर्णय घेऊ शकत नसेल, तर तो मैदानात उपस्थित असलेल्या अंपायरकडून मत घेतो आणि त्याच्या निर्णयावर कायम राहतो. मैदानावरील अंपायर झेल किंवा अन्य निर्णयासाठी तिसर्‍या अंपायरकडे वळतात. सर्व व्हिडीओ आणि कॅमेरा अँगल बघूनही थर्ड अंपायरचं समाधान होत नाही, तो कुठल्याही निष्कर्षापर्यंत येत नाही मग तो फील्ड अंपायरचंच मत शेवटी बरोबर ठरवतो. जर फील्ड अंपायरने आधीच्या निर्णयात फलंदाजाला बाद घोषित केलं असेल किंवा त्याच्या म्हणण्यानुसार तो बाद झाला असेल, तर थर्ड अंपायर फिल्ड अंपायरसोबत ‘सॉफ्ट सिग्नल’ देतो. या नियमात फील्ड अंपायरनं परिस्थिती अधिक जवळून पाहिली असल्याचं मानलं जातं. हाच नियम आता रद्द केला आहे.

COMMENTS