Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

अवैध दारूविक्रीची बातमी प्रसिद्ध केल्याच्या रागातून पत्रकारावर हल्ला; जबरदस्तीने मोटारसायकलवर उचलून नेण्याचा प्रयत्न; चौघांविरुद्ध गुन्हा दाखल

अर्धापूर : तालुक्यातील लहान येथे सुरू असलेल्या अवैध दारूविक्रीबाबत बातमी प्रसिद्ध केल्याच्या रागातून आंबेगाव येथील एका पत्रकारावर हल्ला करण्यात आ

खा.सोनवणेंची शेतकरीहिताची भूमिका पाहून शेतकरी नेतेही भारावलेशेतकर्‍यांचे प्रश्न घेवून शेतकरीनेते खासदारांच्या घरी
शिक्षकांच्या वैद्यकीय बिलांवर 100 रुपये बाँडचा अडथळा’300 पेक्षा जास्त मेडिकल प्रस्ताव वित्त विभागाने फेटाळलेबाँड व नोटरीची अट दूर करून सर्व मेडिकल प्रस्ताव तातडीने निकाली काढावे : महाराष्ट्र राज्य उर्दू शिक्षक संघटनेची मागणी
बदनामी करणाऱ्या त्या महिलांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी

अर्धापूर : तालुक्यातील लहान येथे सुरू असलेल्या अवैध दारूविक्रीबाबत बातमी प्रसिद्ध केल्याच्या रागातून आंबेगाव येथील एका पत्रकारावर हल्ला करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. संबंधित पत्रकाराला मारहाण करत त्यांचा मोबाईल हिसकावून घेण्यात आला तसेच जबरदस्तीने मोटारसायकलवर बसवून घेऊन जाण्याचाही प्रयत्न करण्यात आला. ही घटना गुरुवारी (दि. 26) रात्री सुमारे 9.30 वाजता घडली असून या प्रकरणी अर्धापूर पोलिस ठाण्यात चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, एका दैनिकाचे प्रतिनिधी रामचंद्र ऊर्फ मनोज माणिकराव मनपुर्वे (रा. आंबेगाव) यांनी लहान गावात सुरू असलेल्या अवैध दारूविक्री संदर्भात सविस्तर बातमी प्रसिद्ध केली होती. या बातमीमुळे अवैध व्यवसाय करणार्‍यांमध्ये संताप निर्माण झाला होता. गुरुवारी रात्री मनपुर्वे हे आपल्या घरी असताना दोन मोटारसायकलवर काही जण त्यांच्या घरी आले. आमच्या गावची बातमी पेपरला देणारा तू कोण? असा जाब विचारत त्यांनी मनपुर्वे यांच्याशी वाद घातला.
वादाचे रूपांतर लगेचच मारहाणीमध्ये झाले. आरोपींनी मनपुर्वे यांना शिवीगाळ करत धक्काबुक्की केली आणि बेदम मारहाण केली. यावेळी त्यांच्या हातातील मोबाईल फोन हिसकावून घेतला गेला. एवढ्यावरच न थांबता आरोपींनी मनपुर्वे यांना जबरदस्तीने मोटारसायकलवर बसवून अज्ञात ठिकाणी घेऊन जाण्याचा प्रयत्न केला. या झटापटीदरम्यान मनपुर्वे यांनी जोरात आरडाओरडा केल्याने त्यांच्या कुटुंबीयांसह परिसरातील नागरिक मदतीला धावून आले.
ग्रामस्थ जवळ येत असल्याचे लक्षात येताच आरोपींनी मनपुर्वे यांना सोडून दिले. मात्र जाताना पुन्हा गावात दिसलास तर जिवे मारू अशी धमकी देत त्यांनी घटनास्थळावरून पळ काढला. या प्रकारामुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
या घटनेनंतर मनपुर्वे यांनी अर्धापूर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रारीवरून पोलिसांनी संतोष गोले व इतर चार जणांविरुद्ध भारतीय न्याय संहिता (इछड) कलम 137(2), 62, 115(2), 351(2), 351(3) तसेच पत्रकार संरक्षण कायद्यांतर्गत गुन्हा नोंदविला आहे. पोलीस निरीक्षक चंद्रशेखर कदम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सुरेश भोसले हे या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी पथके तयार केली असून लवकरच त्यांना अटक केली जाईल, अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. पत्रकारांवरील हल्ल्यांविरोधात संताप
या घटनेमुळे पत्रकारांमध्ये संताप व्यक्त केला जात असून, अशा प्रकारे कर्तव्य बजावणार्‍या पत्रकारांवर हल्ले होणे ही लोकशाहीसाठी धोक्याची बाब असल्याची प्रतिक्रिया व्यक्त होत आहे. अवैध धंद्यांवर प्रकाश टाकणार्‍या पत्रकारांना धमकावणे व मारहाण करणे हा गंभीर गुन्हा असून अशा प्रवृत्तीवर कठोर कारवाई होणे आवश्यक असल्याची मागणी पुढे येत आहे.


पुरोगामी विचारांच्या महाराष्ट्रात पत्रकारांवर होणारे असे हल्ले अत्यंत निंदनीय आहेत. अवैध दारूविक्री करणार्‍यांची दादागिरी सहन केली जाणार नाही. या घटनेचा आम्ही तीव्र निषेध करतो. पोलिसांनी संबंधित आरोपींवर कठोर कायदेशीर कारवाई करावी.

COMMENTS