Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

दिव्यांग बांधवांसाठी मदतीचा हात; कोहिणी-पाटण ग्रामपंचायतीकडून निधी वितरण

कडा : आष्टी तालुक्यातील कोहिणी-पाटण ग्रामपंचायतीच्या वतीने दिव्यांग कल्याण डीबीटी योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना निधीचे धनादेश वाटप करण्यात आले.माजी

आमदार धनंजय मुंडे यांच्या प्रयत्नांना यश; सिरसाळा येथील घरकुल धारकांचे थकीत हप्ते खात्यावर जमा!
गेवराईत प्रशासनाचा बेजबाबदारपणा शिगेला; लिलाव रक्कम अडकली, तरुणाने जिल्हाधिकार्‍यांकडे आत्महत्येची परवानगी मागितली; तहसीलदारांसह सहा अधिकार्‍यांवर गंभीर आरोप; अडीच वर्षे पैसे न मिळाल्याने कर्जबाजारी तरुणाचा टोकाचा इशारा
भाटसांगवीत जेवणाच्या कार्यक्रमात राडा; जातीवाचक शिवीगाळ करत कुकरी अन् काठ्यांनी प्राणघातक हल्ला

कडा : आष्टी तालुक्यातील कोहिणी-पाटण ग्रामपंचायतीच्या वतीने दिव्यांग कल्याण डीबीटी योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना निधीचे धनादेश वाटप करण्यात आले.माजी आमदार भिमराव धोंडे व युवानेते अजय धोंडे यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात आला.
गावचे सरपंच दादासाहेब जगताप यांच्या हस्ते सहा दिव्यांग लाभार्थ्यांना धनादेशांचे वितरण करण्यात आले. ग्रामपंचायत स्तरावर दिव्यांगांसाठी राखीव असलेल्या 5 टक्के निधीतून 2025-26 या वर्षासाठी प्रत्येकी 1,356 रुपयांप्रमाणे एकूण 8,136 रुपयांचे धनादेश देण्यात आले.शासनाकडून प्राप्त होणारा दिव्यांग निधी वेळोवेळी अशाच पद्धतीने वितरित केला जात असल्याचे यावेळी सांगण्यात आले. कार्यक्रमाला उपसरपंच अर्चना भवर,ग्रामविकास अधिकारी विजयकुमार पारेकर,कैलास भवर, राहुल खंडागळे,बिभीषण भवर,बाळू वनवे,मंगल भवर यांच्यासह पत्रकार संजय खंडागळे,नितीन कांबळे,संदीप जाधव तसेच युवा नेते सोमनाथ वनवे, अनिल जगताप,दादासाहेब पवार,सतिष भवर,चंद्रकांत दाणी,महादेव पवार,अशोक भवर,सुभाष बोराडे, संपत बोराडे,भिमराव पवार आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

COMMENTS