Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

जेष्ठ अभिनेते रवींद्र महाजनी काळाच्या पडद्याआड

पुणे प्रतिनिधी -- जेष्ठ अभिनेते मराठी चित्रपटसृष्टी गाजवणारे प्रसिद्ध मराठी अभिनेते आणि गश्मीर महाजनी याचे वडील रवींद्र महाजनी यांचं अकाली निधन झ

‘रिक्षामधील आरसे काढून टाका’, महिलांची मुख्यमंत्री शिंदेंकडे मागणी
घरासमोर झोपलेल्या तरूणाचा निर्घृण खून
 उजनी धरण पाणी बचाव संघर्ष समितीच्या वतीने अकरा आमदार आणि दोन खासदारांना पाठवल्या बांगड्या

पुणे प्रतिनिधी — जेष्ठ अभिनेते मराठी चित्रपटसृष्टी गाजवणारे प्रसिद्ध मराठी अभिनेते आणि गश्मीर महाजनी याचे वडील रवींद्र महाजनी यांचं अकाली निधन झालं आहे.  धक्कादायक गोष्ट म्हणजे तळेगाव दाभाडेमधील एका घरात त्यांचा मृतदेह आढळला. ते राहत असलेल्या घरातून दुर्गंधी येतं असल्याचं शेजाऱ्यांनी पोलिसांना सांगितलं. त्यांनी पोलिसांनी घराचा दरवाजा तोडला असता रवींद्र महाजनी मृतावस्थेत सापडले. महाजनी यांचं कुंटुंब मुंबईत राहायला आहे. अभिनेता गश्मीर महाजनीला वडिलांची निधनाची बातमी कळविण्यात आली. शविच्छेदनानंतर महाजनी यांचा मृतदेह कुंटुंबाकडे सोपविण्यात आला. मुंबईतील वैकुंठ स्मशानभूमीत आज त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार दोन ते तीन दिवसांपूर्वीच त्यांचं निधन झाल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. वयाच्या 77 व्या वर्षी त्यांनी जगाचा निरोप घेतला. गेल्या आठ महिन्यांपासून ते आंबी या ठिकाणी एका भाड्याच्या घरात एकटेच राहत होते. घरातून दुर्गंधी येऊ लागल्यानं शेजारी राहणाऱ्या नागरिकांनी पोलिसांना ही माहिती दिली.  रवींद्र महाजनींनी 1975 ते 1990 चा काळ गाजवला होता. मराठीतील विनोद खन्ना अशी त्यांची ओळख होती. मुंबईत टॅक्सी चालवून ते अभिनय क्षेत्रात आले. तब्बल तीन वर्ष त्यांनी टॅक्सी चालवली आहे. अगदी ते टॅक्सी चालवतात म्हणून नातेवाईकांनी त्यांच्याशी संबंध तोडले होते. व्ही शांताराम यांच्या झुंज चित्रपटातून त्यांनी अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं.  त्यांनतर देखण, रुबाबदार, दमदार अभिनय या जोरावर त्यांनी अनेक चित्रपट गाजवले.  रवींद्र महाजनी यांचा मुंबईचा फौजदार, देवता हे चित्रपट खूप गाजले. मात्र त्यांच्या मृतदेह अशा अवस्थेत आढळल्याने मराठी चित्रपटसृष्टीला धक्का बसला आहे. 

COMMENTS