Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

रमजान ईद हा समतेचा संदेश देणारा सण : माजी मंत्री बाळासाहेब थोरात

संगमनेर : भारतामध्ये विविध धर्म–पंथ-जात असूनही मानवताधर्म व भारतीयत्व हे सर्वांना जोडणारे आहे. रमजान ईद हा पवित्र सण एक महिन्याच्या उपवासानंतर ये

ॲसिड हल्ल्यातील चिमुकलीला न्याय द्या; संगमनेरमध्ये भव्य रस्ता रोको ; कठोर शिक्षेची मागणी
जीवघेण्या हल्ल्यांतील आरोपी २४ तासांत जेरबंद; परस्परविरोधी गुन्ह्यांत शेवगाव पोलिसांची धडक कारवाई; मुख्य आरोपींना अटक
अक्षय कर्डिलेंची बदनामी करणाऱ्याचा छडा लावावा; अन्यथा आंदोलन ; भाजप कार्यकर्त्यांचा उपोषणाचा इशारा

संगमनेर : भारतामध्ये विविध धर्म–पंथ-जात असूनही मानवताधर्म व भारतीयत्व हे सर्वांना जोडणारे आहे. रमजान ईद हा पवित्र सण एक महिन्याच्या उपवासानंतर येतो. जगामध्ये मुस्लिम बांधव मोठ्या आनंदाने आणि पवित्र भावनेने हा सण साजरा करतात. यामध्ये देशातील सर्व धर्मीय सहभागी होतात. एकता ही भारतीय संस्कृतीचे वैशिष्ट्य असून रमजान ईद हा बंधुभाव व समतेचा संदेश देणारा सण असल्याचे प्रतिपादन काँग्रेसच्या राष्ट्रीय वर्किंग कमिटीचे सदस्य तथा माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले आहे.    

ईदगाह मैदान येथे रमजान ईद निमित्त मुस्लिम बांधवांना शुभेच्छा देताना ते बोलत होते. यावेळी समवेत माजी आ. डॉ.सुधीर तांबे, आ.सत्यजित तांबे, विश्वासराव मुर्तडक, सोमेश्वर दिवटे, निखिल पापडेजा, नितीन अभंग, डॉ.सातपुते, श्रीपाल शहा, अमित गुंजाळ, गणेश मादास ,सुभाष दिघे, भारत बोराडे, किशोर टोकसे, सादिक तांबोळी, लाला बेपारी, अहमद शेख यांसह मान्यवर उपस्थित होते.   

यावेळी शुभेच्छा देताना थोरात म्हणाले की, रमजानचा महिना हा पवित्र महिना असतो. मुस्लिम बांधव या महिन्यात रोजा उपवास करतात. खरे तर रमजान ईद चा सण हा आनंदाचा, बंधूभावाचा सण आहे. संपूर्ण जगात हा सण साजरा होत असून एकात्मता आणि मानवता धर्म जोपासण्याचा संदेश देणार हा सण आहे.

 राज्यात सुरू असलेल्या खरात प्रकरणाबाबत बोलताना ते म्हणाले काही वेळा मात्र धर्माचा वापर हा चुकीच्या पद्धतीने होताना दिसतो आहे. हे थांबले पाहिजे. सध्या माफीयांचे प्रमाण वाढत चालले आहे. अशा टोळ्यांचा बंदोबस्त करणे गरजेचे आहे. यांच्या माध्यमातूनच हे अत्याचाराचे प्रकार वाढत आहे. अमली पदार्थांची तस्करी माफीयेगिरी तालुक्यात आणखी वाढत आहे. 

  यावेळी आमदार सत्यजित तांबे म्हणाले की, रमजान ईद हा मुस्लिम बांधवांचा पवित्र सण आहे. संगमनेर तालुक्यात कायम सर्वधर्मसमभावाचे वातावरण राहिले आहे. तालुका कायम सर्व जाती धर्माच्या लोकांना एकत्र घेत विकासाच्या दिशेने वाटचाल करत आहे. सध्या मात्र धर्माच्या नावाखाली चुकीचे राजकारण सुरू आहे. विविध दुर्दैवी घटना घडत असून प्रशासनाने सखोल चौकशी करून दोशींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी त्यांनी यावेळी केली.  यावेळी संगमनेर शहरातील मुस्लिम बांधव, इतर सर्व धर्मीय मोठ्या संख्येने उपस्थित होते. या प्रसंगी सर्व मान्यवरांनी त्यांना शुभेच्छा दिल्या.

COMMENTS