Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

कोपरगावमध्ये दोन वर्षानंतर फुलणार ‘गोदाकाठ महोत्सव’

कोपरगाव प्रतिनिधी ः महिला बचत गट व छोट्या-मोठ्या उद्योजकांच्या उत्पादनाचे हक्काचे व्यासपीठ असलेला गोदाकाठ महोत्सव मागील दोन वर्षापासून जीवघेण्या

अहमदनगरमध्ये “भीम पहाट” कार्यक्रमाचे आयोजन
महात्मा फुले कृषि विद्यापीठात सॉफ्टवेअरचे दोन आठवड्याचे प्रशिक्षण संपन्न
शिंदे-फडणवीसांच्या काळात औद्योगिक वीज वापर वाढला

कोपरगाव प्रतिनिधी ः महिला बचत गट व छोट्या-मोठ्या उद्योजकांच्या उत्पादनाचे हक्काचे व्यासपीठ असलेला गोदाकाठ महोत्सव मागील दोन वर्षापासून जीवघेण्या कोरोना महामारीमुळे होवू शकला नाही. मात्र दोन वर्षानंतर पुन्हा एकदा जानेवारी 2023  मध्ये माजी आमदार अशोकराव काळे व आ.आशुतोष काळे यांच्या मार्गदर्शनाखाली मोठ्या उत्साहात गोदाकाठ महोत्सवाचे आयोजन केले असल्याची माहिती गौतम बँकेच्या माजी संचालिका तथा प्रियदर्शनी इंदिरा महिला मंडळाच्या अध्यक्षा पुष्पाताई काळे यांनी दिली आहे.

मागील काही वर्षापासून महिला बचत गटांना आर्थिक उत्पनाचे हक्काचे स्त्रोत निर्माण करून देणारा गोदाकाठ महोत्सव महिला बचत गटांसाठी मोठी पर्वणी ठरला आहे. मात्र मागील दोन वर्ष संपूर्ण विश्‍वावर आलेल्या जीवघेण्या कोरोना महामारीमुळे दोन वर्षापासून हा गोदाकाठ महोत्सव होवू शकला नाही. 2022 च्या सुरुवातीपासूनच या महामारीला उतरती कळा लागून मागील काही महिन्यापासून कोरोना संक्रमण देखील थांबल्यामुळे हि महामारी नियंत्रणात आली आहे. त्यामुळे यावर्षी शुक्रवार (दि.06) ते सोमवार (दि.08) या चार दिवस ‘गोदाकाठ महोत्सवा’ चे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती जिल्हा बँकेच्या माजी संचालिका चैतालीताई काळे यांनी दिली आहे. बचत गटाच्या महिलांनी तयार केलेल्या मालाला हक्काची बाजारपेठ प्राप्त व्हावी व बचत गटाच्या मालाची जास्तीत जास्त विक्री होऊन बचत गटांच्या महिला आर्थिक दृष्ट्या सक्षम व्हाव्यात या उद्देशातून सुरु करण्यात आलेल्या गोदाकाठ महोत्सवाची व्याप्ती दिवसेंदिवस वाढत असून बचत गटाच्या महिलांनी तयार केलेल्या मालाला हक्काची बाजारपेठ मिळवून देणारे व्यासपीठ अशी वेगळी ओळख संपूर्ण जिल्ह्यात ‘गोदाकाठ महोत्सवाची’ झालेली आहे. या महोत्सवाचे उदघाटन शुक्रवार (दि.06) रोजी दुपारी 4.00 वाजता माजी आमदार अशोकराव काळे, गौतम बँकेच्या माजी संचालिका तथा प्रियदर्शनी इंदिरा महिला मंडळाच्या अध्यक्षा पुष्पाताई काळे यांच्या हस्ते व आ. आशुतोष काळे यांच्या उपस्थितीत होणार आहे. या गोदाकाठ महोत्सवाला कोपरगाव तालुकयातील सर्व नागरिकांनी व बचत गटांच्या प्रतिनिधींनी भेट द्यावी. गोदाकाठ महोत्सवाच्या विविध कार्यक्रमांचा आस्वाद घेवून  बचत गटाने तयार केलेल्या मालाच्या थेट खरेदीचा लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हा सहकारी बँकेच्या संचालिका चैतालीताई काळे यांनी केले आहे.

COMMENTS