Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

लोकसभा अध्यक्षांविरुद्ध अविश्‍वास ठराव; सभागृह चालवतांना अध्यक्षांनी पक्षपाती भूमिका घेतल्यांचा विरोधकांचा आरोप

नवी दिल्ली : लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या कामकाजावर आक्षेप घेत विरोधी पक्षांनी त्यांच्याविरुद्ध अविश्‍वासाचा ठराव सादर केला आहे. या ठरावाला

कोविशिल्ड-कोव्हॅक्सिन लसीचे कॉकटेल प्रभावी ;भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेकडून दावा
आढळराव पाटील करणार राष्ट्रवादीत प्रवेश ?
बोगस डॉक्टरांविरोधात शोधमोहीम गतीमान करणार

नवी दिल्ली : लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या कामकाजावर आक्षेप घेत विरोधी पक्षांनी त्यांच्याविरुद्ध अविश्‍वासाचा ठराव सादर केला आहे. या ठरावाला सभागृहातील पन्नासपेक्षा अधिक खासदारांनी पाठिंबा दर्शविल्याने पीठासीन अधिकार्‍यांनी तो मांडण्यास परवानगी दिली. या ठरावावर सभागृहात सुमारे दहा तास चर्चा होणार असल्याचे सांगितले जात आहे.
विरोधी पक्षांनी अध्यक्षांवर सभागृह चालविताना पक्षपाती भूमिका घेतल्याचा आरोप केला आहे. सभागृहाचे कामकाज सुरू होताच विरोधी सदस्यांनी घोषणाबाजी करत गोंधळ घातला. पश्‍चिम आशियात सुरू असलेल्या संघर्षाचा भारतावर होणारा परिणाम, तसेच देशातील ऊर्जा परिस्थितीवर तातडीने चर्चा व्हावी, अशी त्यांची मागणी होती. काही सदस्यांनी केंद्र सरकार आणि निवडणूक प्रक्रियेवरही टीका केली. दरम्यान प्रश्‍नोत्तराच्या तासात केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंह चौहान यांनी शेती व शेतकरी विषयक प्रश्‍नांना उत्तरे दिली. मात्र त्यानंतर सभागृहातील वातावरण पुन्हा तापले. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरुद्धही अविश्‍वासाचा प्रस्ताव आणण्याची तयारी विरोधी पक्ष करत असल्याची माहिती समोर आली आहे. या संदर्भातील मसुदा तयार करण्यात आल्याचे सांगितले जात असून पुढील आठवड्यात तो मांडला जाऊ शकतो.

COMMENTS