Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मराठी पत्रकार परिषदेच्या वतीने ‘नारी सन्मान आदर्श पुरस्कार 2026’ साठी प्रस्ताव मागविण्याचे आवाहन

पाटोदा । प्रतिनिधीजागतिक महिला दिनाचे औचित्य साधून दरवर्षीप्रमाणे यंदाही मराठी पत्रकार परिषद, पाटोदा यांच्या वतीने राज्यस्तरीय ‘नारी सन्मान आदर्श

लोककलेच्या माध्यमातून सातारा जिल्ह्यात विकास कामांचा जागर
नव्या लोकसभेत कोणत्याही पक्षाला बहुमत नाही !
मोदी सरकारविरोधात उद्या काळा दिवस पाळणार

पाटोदा । प्रतिनिधी
जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून दरवर्षीप्रमाणे यंदाही मराठी पत्रकार परिषद, पाटोदा यांच्या वतीने राज्यस्तरीय ‘नारी सन्मान आदर्श पुरस्कार 2026’ चे आयोजन करण्यात आले आहे. समाजाच्या विविध क्षेत्रांत उल्लेखनीय व प्रेरणादायी कार्य करणार्‍या महिलांचा या पुरस्काराद्वारे सन्मान करण्यात येणार आहे.
या पुरस्कारासाठी आदर्श माता, सामाजिक कार्य, शिक्षण, वैद्यकीय, कृषी, पशुवैद्यकीय, अभियांत्रिकी, प्रशासकीय सेवा, पोलीस, वकील, क्रीडा, उद्योजिका, सीईओ, मॅनेजर, अकाउंटंट, क्लार्क, बँकिंग, पत्रकारिता, अध्यात्म, साहित्य, राजकीय क्षेत्र, ग्रामसेविका, तलाठी, सरपंच, आशा सेविका, नर्स, अंगणवाडी सेविका, कृषी सहाय्यक, चालक, वाहक, वायरमन, बचत गट तसेच आदर्श उद्योगजिका आदी विविध क्षेत्रांतील महिलांकडून प्रस्ताव मागविण्यात आले आहेत. इच्छुक महिलांनी आपल्या कार्याची वृत्तपत्रांनी घेतलेली दखल (बातमी कात्रणे), प्राप्त पुरस्कारांची छायाचित्रे व आवश्यक कागदपत्रांसह अर्ज तयार करून दि. 5 मार्च 2026 पूर्वी पोस्ट, कुरिअर, समक्ष अथवा सुचकामार्फत खालील व्हॉट्सअ‍ॅप क्रमांकावर पाठवावेत. प्राप्त प्रस्तावांमधून पात्र महिलांची निवड करून पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. पुरस्कार वितरण सोहळ्याची तारीख, वेळ व स्थळ लवकरच जाहीर करण्यात येणार आहे. अधिक माहितीसाठी – तालुका अध्यक्ष प्रा. अजय जोशी (मो. 9403700131), तालुका उपाध्यक्ष जावेदभाई शेख (9158116211), सचिव हमिदखान पठाण (9545434500), ग्रामीण भागासाठी जिल्हा उपाध्यक्ष प्रा. सचिन पवार (9921801919), तालुका उपाध्यक्ष अशोक भवर (8390998911) यांच्याशी संपर्क साधावा. तालुक्यातील विविध क्षेत्रांत कार्यरत असलेल्या जास्तीत जास्त महिलांनी आपल्या कार्याचा प्रस्ताव पाठवावा, असे आवाहन जेष्ठ पत्रकार छगन मुळे, दयानंद सोनवणे, जिल्हा उपाध्यक्ष कादर मकराणी, तालुका कार्याध्यक्ष प्रा. सोमनाथ खंडागळे, तालुका उपाध्यक्ष अनिल गायकवाड, शहराध्यक्ष सय्यद फय्याज, हल्ला कृती समिती तालुका अध्यक्ष संजय सानप, पवन भोकरे, सचिन शिंदे, सय्यद सज्जाद, दत्ता देशमाने, डिजिटल मीडिया तालुका अध्यक्ष गोकुळ इंगोले, सचिव हरिदास शेलार, गणेश शेवाळे व बबन पवार यांनी केले आहे.

COMMENTS