Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पाथर्डीत शिवजयंती उत्साहात ; विविध उपक्रमांचे आयोजन

पाथर्डी : शहरासह तालुक्यात छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्साहात व विविध उपक्रमांनी साजरी करण्यात आली. शहरात माऊली कोकाटे मित्र मंडळाच्या वतीने कोरडगाव चौकात शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी नगराध्यक्ष अभय आव्हाड, उपनगराध्यक्ष मंगल कोकाटे, नंदकुमार शेळके, बंडूशेठ बोरुडे, ऍड. प्रतीक खेडकर, संजय देशमुख, नितीन गर्जे, दिगंबर गाडे, पप्पू बोर्डे, आदिनाथ डोमकावळे, किशोर परदेशी, बाळासाहेब सोनटक्के, मनिषा उदमले, वर्षा मोरे, वंदना टेके, अरुण कोकाटे आदी मान्यवर उपस्थित होते. उपस्थितांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.  कसबा पेठ येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास मान्यवरांच्या हस्ते सकाळी अभिवादन करण्यात आले तर सायंकाळी कसबा पेठ ‘जिवाभावाची माणसं’ तरुण मंडळाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीदरम्यान सामाजिक संदेश देणारा जिवंत देखावा सादर करण्यात आला. मंडळाचे अध्यक्ष महेश बोरुडे, राजेंद्र उदारे, विठ्ठल बोरुडे, महेश केकान, सतीश काटे, सागर पाथरकर, संजीव गोसावी आदी उपस्थित होते. मिरवणुकीत आकर्षक देखावे आणि डिजेच्या गजरात शहरातून भव्य संचलन काढण्यात आले. या मिरवणुकीसाठी डॉ. मृत्युंजय गर्जे, नंदकुमार शेळके, बंडूशेठ बोरुडे हे उपस्थित होते.

योग्य शिक्षण मिळणे हाच यशाचा मार्ग ः डॉ. वंदना मुरकुटे
नगरसेविका वंदना टेकेंच्या अपात्रतेची सुनावणी २० तारखेला
छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याची विटंबना; एक ताब्यात

पाथर्डी : शहरासह तालुक्यात छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्साहात व विविध उपक्रमांनी साजरी करण्यात आली. शहरात माऊली कोकाटे मित्र मंडळाच्या वतीने कोरडगाव चौकात शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी नगराध्यक्ष अभय आव्हाड, उपनगराध्यक्ष मंगल कोकाटे, नंदकुमार शेळके, बंडूशेठ बोरुडे, ऍड. प्रतीक खेडकर, संजय देशमुख, नितीन गर्जे, दिगंबर गाडे, पप्पू बोर्डे, आदिनाथ डोमकावळे, किशोर परदेशी, बाळासाहेब सोनटक्के, मनिषा उदमले, वर्षा मोरे, वंदना टेके, अरुण कोकाटे आदी मान्यवर उपस्थित होते. उपस्थितांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

 कसबा पेठ येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास मान्यवरांच्या हस्ते सकाळी अभिवादन करण्यात आले तर सायंकाळी कसबा पेठ ‘जिवाभावाची माणसं’ तरुण मंडळाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीदरम्यान सामाजिक संदेश देणारा जिवंत देखावा सादर करण्यात आला. मंडळाचे अध्यक्ष महेश बोरुडे, राजेंद्र उदारे, विठ्ठल बोरुडे, महेश केकान, सतीश काटे, सागर पाथरकर, संजीव गोसावी आदी उपस्थित होते. मिरवणुकीत आकर्षक देखावे आणि डिजेच्या गजरात शहरातून भव्य संचलन काढण्यात आले. या मिरवणुकीसाठी डॉ. मृत्युंजय गर्जे, नंदकुमार शेळके, बंडूशेठ बोरुडे हे उपस्थित होते.

COMMENTS