Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

योग्य शिक्षण मिळणे हाच यशाचा मार्ग ः डॉ. वंदना मुरकुटे

पाथर्डी ः शालेय विद्यार्थ्यांना जर योग्य वयात योग्य शिक्षण व मार्गदर्शन मिळाले तर त्यांना भविष्यात यशस्वी होण्यापासून कोणीही रोखू शकत नाही, त्यामुळे प

शिक्षणाला आध्यात्मिकतेची जोड देण्याची गरज : माजी आ. पिचड
शिक्षणाच्या विश्‍वासार्हतेवर घाला !
शिक्षण क्षेत्रातील योगदानाचा गौरव

पाथर्डी ः शालेय विद्यार्थ्यांना जर योग्य वयात योग्य शिक्षण व मार्गदर्शन मिळाले तर त्यांना भविष्यात यशस्वी होण्यापासून कोणीही रोखू शकत नाही, त्यामुळे पालकांनी व शिक्षकांनी विद्यार्थ्यांना योग्य वयात योग्य शिक्षण व योग्य मार्गदर्शन मिळेल यासाठी प्रयत्न करायला हवेत असे प्रतिपादन श्रीरामपूर पंचायत समितीच्या मा.सभापती डॉ. वंदना मुरकुटे यांनी पाथर्डी येथे राजीव फाऊंडेशन आयोजित शालेय विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती वाटप व मुक्त संवाद या कार्यक्रमाप्रसंगी केले.
यावेळी शिवशंकर राजळे, बंडू बोरुडे श्रीकांत काळोखे, दत्ता केदार,धनंजय डहाळे, चेमटे मॅडम, बशीर शेख, महंमद शेख, निलेश पिसे, जावेदा जिंदगी, गणेश धनवडे, सुनिल शिंदे, मुबारक शेख, दगडू धनवडे, अमित घडशी, गणेश धनवडे आदींसह शिष्यवृत्ती लाभधारक विद्यार्थी आणि त्यांचे पालक  उपस्थित होते.यावेळी राजीव फाऊंडेशन तर्फे पाथर्डी तालुक्यातील इयत्ता आठवी ते बारावी पर्यंतच्या गरीब व गरजू विद्यार्थ्यांना राजीव इजुकेशनल असीसट्ंस प्रोग्राम या प्रकल्पा अंतर्गत प्रत्येकी वार्षिक सहा हजार रुपये प्रमाणे 11 शिष्यवृत्तीचे वाटप करण्यात आले कार्यक्रमाचे सुत्रसंचालन हुमायून अत्तार, प्रास्ताविक राजीव फाऊंडेशनचे अध्यक्ष सलीम शेख यांनी तर आभार प्रदर्शन अरविंद सोनटक्के यांनी मानले.

COMMENTS