मुंबई ः सार्वजनिक बांधकाम विभागातील मुंबई शहर इलाखा विभागातील कार्यकारी अभियंता विद्याधर पाटसकर आणि त्यांच्या सोबतच्या कंपू मंडळीनी भ्रष्टाचाराचा

मुंबई ः सार्वजनिक बांधकाम विभागातील मुंबई शहर इलाखा विभागातील कार्यकारी अभियंता विद्याधर पाटसकर आणि त्यांच्या सोबतच्या कंपू मंडळीनी भ्रष्टाचाराचा उच्छाद मांडला असून नियमबाह्य कामांचा धडाका लावला आहे. मात्र या विभागात येण्यासाठी पाटसकरांनी नेमके कुणाला 12 कोटी रूपये दिले, ते पैसे नेमके कुठून आले, 12 कोटी दिल्यानंतर त्याची वसुली कोणत्या पद्धतीने सुरू आहेत, याचे संपूर्ण पुरावे आणि साक्षीदार आमच्याजवळ असून, यासंदर्भातील तक्रार आम्ही यापूर्वीच पंतप्रधान कार्यालय, राष्ट्रपती कार्यालय, लोकायुक्त, मुख्यमंत्री आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री, अतिरिक्त प्रधान सचिव आणि लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केलेल्या आहेत, त्यामुळे पाटसकर यांनी केलेला 250 कोटींच्या घोटाळ्याचा लवकरच पर्दाफाश होईल यात कोणतीही शंका नाही.
याविषयी सविस्तर माहिती अशी की, कार्यकारी अभियंता पाटसकर मुंबई शहर इलाखा विभागात आल्यानंतर त्यांनी ठेकेदारांकडून थेट 30 टक्के दराने पैसे वसुल करण्याचा धडाकाच लावला आहे. ठेकेदार यासंदर्भात बोलत नाही. कारण ठेकेदारांनी बाजारातून व्याजानी पैसे घेतलेले असतात, काम झाल्यानंतर आणि एलओसी आल्यानंतर व्याजाचे पैसे ठेकेदार परत करतात. कार्यकारी अभियंता यांनी ठेकेदारांचे बिलं अदा करण्यासाठी थेट 30 टक्के रक्कमच मागितली, तरच तुमचे बिलं काढता येईल, अन्यथा तुम्हाला माझ्या मागं-मागं फिरावं लागेल, अशी तंबीच देत 30 टक्के दरांनी पैसे जमा केले. यासोबतच पाटसकरांनी आपला जो कंपू जमवला आहे, त्यामध्ये डीपीटीसीची कामे, तसेच एमओडबल्यूची जी कामे मंजूर करण्यात आली आहेत, त्यामध्ये एकच अंदाजपत्रक, एकच काम दोन ठिकाणी दाखवून देयके काढण्यात आल्याचे वास्तव दिसून येत आहे. त्याचप्रमाणे पाटसकरांकडे असलेले उपविभागाील अधिकारी असलेले उपअभियंता घरत, श्रीमती रेश्मा चव्हाण, प्रशांत गायकवाड आणि सेवानिवृत्त डावखर यांनी संगनमताने, शासनाचा अधिकारांचा गैरवापर करून, शासकीय निधीचा अपहार केला आहे. एकच कामे दोनवेळेस दाखवून कोट्यावधींची देयके अदा करण्यात आली आहेत. एमओडबल्यू आणि डीपीटीसीची जी कामे आहेत, त्यामध्ये अंदाजपत्रकामध्ये 40 टक्के सेविंग केली आहे, मात्र देयके 100 टक्के अंदाजपत्रकाप्रमाणे, काही जादा दराने तर काही कमी दराने काढण्यात आली आहेत. त्यामुळे या संपूर्ण 250 कोटींचा घोटाळ्याची संपूर्ण चौकशी करून संबंधित अधिकार्यांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची आमची प्रमुख मागणी आहे.
शाखा अभियंता कमलापुरेंनी एकाच कामाचे काढले दोन देयके
प्रेसिडेन्सी विभागामध्ये ओल्ड कस्टमला असलेले शाखा अभियंता कमलापुरे हे पूर्वी पोद्दार हॉस्पिटल शाखा, एटीसी शाखा या विभागात होते. त्यांनी पोद्दार हॉस्पिटलमध्ये त्यांनी डीपीटीसीचे आणि एमओडबल्यूचे दोन कामं वेगवेगळी दाखवण्यात आली असली तरी, प्रत्यक्षात दोन्ही कामं एकच असून, त्यांनी वेगवेगळे देयकं काढून कोट्यावधींचा अपहार केला आहे. यासंदर्भात आम्ही सर्व वर्क ऑर्डर मागवल्या असून, कमलापुरे यांनी कसा भ्रष्टाचार केला, तसेच येथील घोडके नावाच्या शाखा अभियंत्याला कसा त्रास दिला, तसेच कमलापुरे यांनी नातेवाईकांचे बस्तान कुठे आणि कसे बसवले, याचा सविस्तर वृत्तांत उद्यापासून सविस्तर

COMMENTS