कॅन्टोन्मेंटकडून स्थानिक वाहनांच्या टोल वसुलीने नाराजी

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

कॅन्टोन्मेंटकडून स्थानिक वाहनांच्या टोल वसुलीने नाराजी

अहमदनगर/प्रतिनिधी : नगर-सोलापूर महामार्गावरील भिंगार कॅन्टोन्मेंट हद्दीच्या सीमेवर असलेल्या कॅन्टोन्मेंटच्या टोल नाक्यावर स्थानिक नगरच्या वाहनांकडून

पढेगांवला पर्यावरण दिनानिमित्त वृक्षरोपण
भास्कर महाराज दाणे यांचे निधन
बनावट दाखला देऊन लष्करात झाला भरती ; फसवणुकीचा गुन्हा दाखल

अहमदनगर/प्रतिनिधी : नगर-सोलापूर महामार्गावरील भिंगार कॅन्टोन्मेंट हद्दीच्या सीमेवर असलेल्या कॅन्टोन्मेंटच्या टोल नाक्यावर स्थानिक नगरच्या वाहनांकडून टोलवसुली सुरू झाल्याने वाहन चालक व मालकांतून नाराजी व्यक्त होत आहे. याआधी अशी टोलवसुली स्थानिक वाहनांकडून होत नव्हती. मात्र, मागील दोन दिवसांपासूनच ही वसुली सुरू झाल्याचे वाहन चालकांचे म्हणणे आहे.
नगरहून सोलापूर रस्त्याने जा-ये करणार्‍या अन्य जिल्ह्यांतील व परराज्यांतील अवजड तसेच मालवाहतुकीच्या वाहनांकडून भिंगार कॅन्टोन्मेंट हद्दीच्या सीमेवर टोल वसुली केली जाते. भिंगार कॅन्टोन्मेंटने या टोल वसुलीचे खासगी कंत्राट दिले आहे. या टोल नाक्याद्वारे होणारी वसुली, तेथे होणारी नगर, भिंगार व नगर तालुक्यातील विविध पक्षीय राजकीय नेत्यांच्या समर्थकांमधील भांडणे, दादागिरी व मारामार्‍या नेहमी चर्चेत असतात. ही टोलवसुली कायदेशीर नसल्याचेही अनेकांचे म्हणणे आहे. या पार्श्‍वभूमीवर आतापर्यंत या टोल नाक्यावर नगरमधील (एमएच-16) वाहनांकडून स्थानिक वाहने म्हणून टोल घेतला जात नव्हता. पण मागील दोन दिवसांपासून एमएच-16 अशा क्रमांकांच्या वाहनांकडूनही टोलवसुली सुरू झाली आहे. मालवाहतुकीच्या आयशर गाडीकडून 60 रुपये व पीकअप व्हॅनकडून 40 रुपये घेतले जात आहे. असे पैसे देण्यास संबंधित वाहनचालकांनी नकार दिला तर पैसे देण्यासाठी त्याच्यावर दादागिरी केली जाते, असेही वाहनचालकांकडून सांगितले जाते. दरम्यान, नगरमधील एका तोतया पत्रकाराच्या पाठबळाने संबंधित ठेकेदाराने ही टोलवसुली स्थानिक वाहनांकडूनही सुरू केल्याचेही बोलले जात आहे. त्यामुळे त्याबाबतही नाराजी व्यक्त होत आहे.

ती वसुली नियमाने-पवार
भिंगार कॅन्टोन्मेटच्या टोल नाक्यावर स्थानिक वाहनांकडून होत असलेली टोल वसुली नियमाप्रमाणे होत असल्याचे भिंगार कॅन्टोन्मेंटचे मुख्य कार्यकारी अधिकारी विद्याधर पवार यांनी सांगितले. फक्त भिंगार कॅन्टोन्मेंट हद्दीत ज्या गाड्या अनलोड (माल खाली करतात) होतात, त्यांनाच फक्त टोलमधून सवलत आहे. भिंगार कॅन्टोन्मेंट हद्दीत लोड (माल भरला जाणार्‍या) होणार्‍या तसेच शहर परिसरातील मालवाहतुकीच्या गाड्यांना येथे टोल आकारला जाणार आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

स्थानिक वाहनांवर अन्याय
एमएच-16 क्रमांकाची अनेक मालवाहतूक वाहने स्थानिक नगर शहर व उपनगरांतून माल भरून त्यांची नगर तालुक्यातीलच काही गावांतून पोहोचवणूक करतात व तेथूनही काही माल शहरात आणतात. यामुळे त्यांची या रस्त्याने नेहमी ये-जा सुरू असते. अशास्थितीत प्रत्येक ये-जा करतेवेळी अशी टोल वसुली झाली तर तो वाहन चालक व मालकांवर तसेच ज्याचा माल आहे, त्याच्यावर अन्याय ठरेल, असे म्हणणे वाहनचालकांचे आहे.

COMMENTS