स्थानिक गुन्हे शाखेकडून मुख्य आरोपीस ह 5 जण ताब्यातनांदेड । प्रतिनिधीलोहा तालुक्यातील चिखलभोसी ते पानभोसी दरम्यान असलेल्या मल्लिकार्जुन किडे यांच्

स्थानिक गुन्हे शाखेकडून मुख्य आरोपीस ह 5 जण ताब्यात
नांदेड । प्रतिनिधी
लोहा तालुक्यातील चिखलभोसी ते पानभोसी दरम्यान असलेल्या मल्लिकार्जुन किडे यांच्या आखाड्यावर एका बालकावर प्राणघातक हल्ला करून फरार झालेल्या आरोपींचा नांदेड जिल्हा स्थानिक गुन्हे शाखेने यशस्वीरीत्या छडा लावला आहे. या कारवाईत 18 वर्षीय मुख्य आरोपीसह चार विधीसंघर्षग्रस्त बालकांना ताब्यात घेण्यात आले असून, गुन्ह्यात वापरलेली शस्त्रेही जप्त करण्यात आली आहेत.
नांदेड जिल्ह्यातील गुन्हेगारीवर प्रभावी नियंत्रण मिळवण्यासाठी पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांच्या संकल्पनेतून राबविण्यात येत असलेल्या ‘ऑपरेशन फ्लश आऊट’ मोहिमेअंतर्गत ही कारवाई करण्यात आली आहे. सदर घटनेनंतर आरोपी फरार झाल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. फरार आरोपींचा शोध घेण्याचे आदेश पोलीस अधीक्षकांनी स्थानिक गुन्हे शाखेला दिले होते. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक उदय खंडेराय यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक वसंत अरसेवार व त्यांच्या पथकाला गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, सदर गुन्ह्यातील आरोपी हिंगोली गेट येथील फटाका मार्केट परिसरात लिंबाच्या झाडाखाली थांबलेले आहेत. या माहितीच्या आधारे पथकाने तत्काळ सापळा रचून आरोपींना शिताफीने ताब्यात घेतले. ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपींमध्ये महेश वासुदेव राठोड (वय 18 वर्षे, रा. खंबाळा, ता. किनवट) यासह चार विधीसंघर्षग्रस्त बालकांचा समावेश आहे. आरोपींची अंगझडती घेतली असता त्यांच्याकडून अंदाजे 500 रुपये किमतीचा लोखंडी खंजर व 200 रुपये किमतीचा फोल्डिंग चाकू जप्त करण्यात आला. प्राथमिक चौकशीत आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली आहे. पुढील कायदेशीर कार्यवाहीसाठी सर्व आरोपींना लोहा पोलीस ठाण्याच्या स्वाधीन करण्यात आले आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार, अपर पोलीस अधीक्षक श्रीमती अर्चना पाटील (भोकर), अपर पोलीस अधीक्षक सूरज गुरव (नांदेड) व उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीमती अश्विनी जगताप (कंधार) यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. कारवाईत सहाय्यक पोलीस निरीक्षक वसंत अरसेवार यांच्यासह पोलीस अंमलदार राजकुमार डोंगरे, विश्वनाथ पवार, ज्ञानेश्वर कलंदर, संतोष बेल्लुरोड, संजय च्यापलवार तसेच सायबर सेलचे दिपक ओढणे व सिटीकर यांनी सहभाग घेतला. या उल्लेखनीय कामगिरीबद्दल पोलीस अधीक्षकांनी पथकाचे कौतुक केले आहे.

COMMENTS