Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

केमिस्ट हृदय सम्राट’ क्रिकेट स्पर्धा उत्साहात  

  कोपरगाव शहर : केमिस्ट बांधवांचे श्रद्धास्थान असलेले केमिस्ट हृदय सम्राट माजी आमदार जगन्नाथ उर्फ आप्पासाहेब शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त कोपरगाव तालुका क्रिकेट असोसिएशनच्या वतीने डॉक्टर, वैद्यकीय प्रतिनिधी व केमिस्ट बांधव यांच्याकरिता आत्मा मालिक क्रिकेट मैदानावर आयोजित केलेल्या क्रिकेट चषकाचे उद्घाटन १ फेब्रुवारी रोजी ज्येष्ठ नागरिक मंचाचे विजय बंब, ओम डागा, विकास किर्लोस्कर, सुरेंद्र ठोळे यांच्या शुभहस्ते झाले.    स्पर्धेची सुरुवात राष्ट्रगीताने होऊन दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार व केमिस्ट बांधव व त्यांच्या परिवारातील सदस्यांना श्रद्धांजली अर्पण करत उद्घाटक बंब यांनी शहरात भव्य दिव्य असे केमिस्ट भवनांची उभारणी केल्याबद्दल अध्यक्ष गणेश वाणी व केमिस्ट बांधवांचे अभिनंदन केले. अहिल्यानगर, संभाजीनगर व नाशिक जिल्ह्यातील १० संघानी या स्पर्धेत सहभाग नोंदवत अंतिम सामना वैजापूर वॉरीयर्स व अहिल्यानगर फायटर यांच्यात होऊन वैजापूर वॉरीयर्स या संघाने विजेते पद पटकावले.   सदर स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ सहकार महर्षी शंकराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष विवेक कोल्हे व नगराध्यक्ष पराग संधान यांच्या हस्ते संपन्न झाला.  याप्रसंगी कोल्हे यांनी या स्पर्धेमुळे क्रीडा संस्कृतीचे अनोखे प्रदर्शन क्रीडा प्रेमींना लाभले असल्याचे सांगितले. संघटनेचे अध्यक्ष गणेश वाणी हे सर्वांना सोबत घेऊन संघटना वाढीसाठी काम करणारा कामाचा माणूस असल्याचे सांगितले. तर नगराध्यक्ष संधान यांनी देखील या संघटनेच्या कामाचे कौतुक करत विजेत्या संघाचे अभिनंदन केले.   सदर स्पर्धा यशस्वीतेसाठी केमिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष गणेश वाणी,उपाध्यक्ष भरत मोरे, सचिव प्रवीण गवळी, खजिनदार महेश मते, जिल्हा प्रतिनिधी विजय जगताप, सचिन अमृतकर, आकाश वडांगळे, नितेश बंब, वैभव निकुंभ,विनायक व्यवहारे, सुमेर पुरोहित, अतुल जगझाप, अतुल पाटील, तोफिक कुरेशी,अक्षय आभाळे, अशोक परजणे, पुरुषोत्तम गवळी, कयूम शेख, अश्फाक पठाण, राहुल नेहे, सत्यम जगदाळे, शेखर खरात, रवी वाघाडकर आदींसह संघटनेचे पदाधिकारी व केमिस्ट बांधवांनी विशेष प्रयत्न केले.

शिवरायांचा कारभार हा लोककल्याणकारी होता : माजी आ. काळे
संजीवनी इंजिनिअरिंगच्या पाच विद्यार्थ्यांना नोकरी
सडे परिसरात बिबट्यांची दहशत ; पिंजरा लावण्याची मागणी

  कोपरगाव शहर : केमिस्ट बांधवांचे श्रद्धास्थान असलेले केमिस्ट हृदय सम्राट माजी आमदार जगन्नाथ उर्फ आप्पासाहेब शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त कोपरगाव तालुका क्रिकेट असोसिएशनच्या वतीने डॉक्टर, वैद्यकीय प्रतिनिधी व केमिस्ट बांधव यांच्याकरिता आत्मा मालिक क्रिकेट मैदानावर आयोजित केलेल्या क्रिकेट चषकाचे उद्घाटन १ फेब्रुवारी रोजी ज्येष्ठ नागरिक मंचाचे विजय बंब, ओम डागा, विकास किर्लोस्कर, सुरेंद्र ठोळे यांच्या शुभहस्ते झाले.

   स्पर्धेची सुरुवात राष्ट्रगीताने होऊन दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार व केमिस्ट बांधव व त्यांच्या परिवारातील सदस्यांना श्रद्धांजली अर्पण करत उद्घाटक बंब यांनी शहरात भव्य दिव्य असे केमिस्ट भवनांची उभारणी केल्याबद्दल अध्यक्ष गणेश वाणी व केमिस्ट बांधवांचे अभिनंदन केले. अहिल्यानगर, संभाजीनगर व नाशिक जिल्ह्यातील १० संघानी या स्पर्धेत सहभाग नोंदवत अंतिम सामना वैजापूर वॉरीयर्स व अहिल्यानगर फायटर यांच्यात होऊन वैजापूर वॉरीयर्स या संघाने विजेते पद पटकावले.

  सदर स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ सहकार महर्षी शंकराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष विवेक कोल्हे व नगराध्यक्ष पराग संधान यांच्या हस्ते संपन्न झाला.

 याप्रसंगी कोल्हे यांनी या स्पर्धेमुळे क्रीडा संस्कृतीचे अनोखे प्रदर्शन क्रीडा प्रेमींना लाभले असल्याचे सांगितले. संघटनेचे अध्यक्ष गणेश वाणी हे सर्वांना सोबत घेऊन संघटना वाढीसाठी काम करणारा कामाचा माणूस असल्याचे सांगितले. तर नगराध्यक्ष संधान यांनी देखील या संघटनेच्या कामाचे कौतुक करत विजेत्या संघाचे अभिनंदन केले.

  सदर स्पर्धा यशस्वीतेसाठी केमिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष गणेश वाणी,उपाध्यक्ष भरत मोरे, सचिव प्रवीण गवळी, खजिनदार महेश मते, जिल्हा प्रतिनिधी विजय जगताप, सचिन अमृतकर, आकाश वडांगळे, नितेश बंब, वैभव निकुंभ,विनायक व्यवहारे, सुमेर पुरोहित, अतुल जगझाप, अतुल पाटील, तोफिक कुरेशी,अक्षय आभाळे, अशोक परजणे, पुरुषोत्तम गवळी, कयूम शेख, अश्फाक पठाण, राहुल नेहे, सत्यम जगदाळे, शेखर खरात, रवी वाघाडकर आदींसह संघटनेचे पदाधिकारी व केमिस्ट बांधवांनी विशेष प्रयत्न केले.

COMMENTS