Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

संगमनेर नगरपरिषदेचे काम राज्यासाठी आदर्शवत ठरेल

माजी मंत्री थोरात ; ड्रेनेज साफसफाईसाठी जेटिंग मशीनचे लोकार्पण संगमनेर : लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली संगमनेर नगर परिषदेने सातत्या

कॅन्सर रुग्णांच्या सेवेसाठी टाटा-एसएमबीटी हॉस्पिटल एकत्र – महसूलमंत्री नामदार बाळासाहेब थोरात
पालकमंत्रीच राहा; मालक बनू नका
जिल्ह्यातील विकास कामांबरोबर निळवंडेही रखडले

माजी मंत्री थोरात ; ड्रेनेज साफसफाईसाठी जेटिंग मशीनचे लोकार्पण

संगमनेर : लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली संगमनेर नगर परिषदेने सातत्याने नागरिकांना अत्याधुनिक व चांगल्या सुविधा दिल्या आहेत. शहरात भूमिगत गटारे योजना असून पावसाळ्यात किंवा इतर काळात तातडीने व सुरक्षित पद्धतीने गटारी व ड्रेनेज साफ करण्यासाठी अत्याधुनिक जेटिंग मशीन घेण्यात आली असून या नवीन मशीनचे लोकार्पण लोकनेते बाळासाहेब थोरात व आ. सत्यजित तांबे यांच्या हस्ते करण्यात आले. संगमनेर नगरपालिका आपल्या चांगल्या कामामधून राज्यात आदर्शवत ठरेल असा विश्वास माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केला.

सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात क्रीडा संकुल येथे नगरपालिकेने घेतलेल्या 5 हजार लिटर क्षमतेच्या जेटिंग मशीनचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी माजी मंत्री  बाळासाहेब थोरात, आ.सत्यजित तांबे, नगराध्यक्ष डॉ.मैथिली तांबे, उपनगराध्यक्ष नूर मोहम्मद शेख, नगरसेवक दिलीपराव पुंड, विश्वासराव मुर्तडक, शोभा पवार,  प्राची काशीद यांच्यासह विविध अधिकारी उपस्थित होते.

 शहरातील भूमिगत गटारी व ड्रेनेज साफ करण्यासाठी पाच हजार लिटर जेटिंग क्षमता व तीन हजार लिटरची गाळ व कचरा शोषून घेण्याची क्षमता असलेल्या या अत्याधुनिक मशीन मुळे तुंबलेल्या गटारी तातडीने स्वच्छ करणे शक्य होणार आहे. 55 लाख रुपये किमतीच्या या नवीन मशीन मुळे मनुष्याने गटारीमध्ये उतरून गटार साफ करण्याची गरज नसून यामुळे धोका टाळणार आहे. अधिक वेगवान सुरक्षित व परिणामकारक गटारींची साफसफाई या आधुनिक यंत्रामुळे होणार आहे. हा राज्यामध्ये पहिला अभिनव प्रकल्प राबवला जात आहे.

 यावेळी बोलताना डॉ.मैथिली तांबे म्हणाल्या की, सर्व नागरिकांच्या सहकार्यातून संगमनेर शहराला आणखी पुढे नेण्यासाठी आपण काम करू असे त्या म्हणाल्या. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्य कार्यकारी अधिकारी दयानंद गोरे यांनी केले तर अमजद पठाण यांनी आभार मानले. 

COMMENTS