Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

अवैध गांजा विक्री प्रकरणी महिलेस अटक; 61 हजार 500 रुपयांचा गांजा जप्त

फलटण : जप्त केलेल्या मुद्देमालासमवेत गांजा विक्री करणारी महिला व पोलीस कर्मचारी. फलटण / प्रतिनिधी : साखरवाडी येथे चंदाबाई बाळू जाधव या गांजा विक्र

भारतात आज राष्ट्रीय दुखवटा : जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे यांची हत्या
कुलगुरु सुभाष चौधरी पुन्हा चौकशीच्या फेर्‍यात
स्व. यशवंतराव चव्हाण समाधीस्थळी अभिनेता नाना पाटेकर यांच्याकडून अभिवादन

फलटण / प्रतिनिधी : साखरवाडी येथे चंदाबाई बाळू जाधव या गांजा विक्री करत असल्याची माहिती फलटण ग्रामीण पोलीस स्टेशनच्या आणि साखरवाडी दूरक्षेत्राच्या पोलीस उपनिरीक्षक सौ. स्वाती घोंगडे यांना मिळाली होती. स्वाती घोंगडे यांनी आपल्या पोलीस कर्मचार्‍यांना समवेत या ठिकाणी जावून माहिती घेत आंबेडकरनगर साखरवाडी गावच्या हद्दीमध्ये चंदाबाई बाळू जाधव ही तिच्या राहत्या घरी पत्र्यांच्या शेडच्या आडोशालगत बेकायदेशीर चोरटी गांजाची विक्री करत असल्याने तिच्या हालचालीवरुन दोन पंच असे चंदाबाई बाळू जाधव यांच्या घराजवळ गेल्यानंतर तिच्या हालचालीवरुन पोलिसांनी तिला ताब्यात घेतले. तिच्या कब्जांतील पिशवीची पाहणी केली असता त्यामध्ये एकूण 61 हजार पाचशे रुपये किमतीचा गांजा आढळून आला. तिच्या विरोधात फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात गुंगीकार औषध द्रव्य आणि मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम 1985 कलम 20( ब) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. गपचूप चालणारा गांजा विक्रीचा धंद्यावर फलटण ग्रामीण पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी धन्यकुमार गोडसे यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलीस उपनिरीक्षक स्वाती घोंगडे यांनी तसेच पथकाने फलटण ग्रामीण पोलीस ठाण्याची स्थापना झाल्यापासून 12 वर्षातील आजपर्यंतची गांजा विक्रीची सर्वात मोठी कारवाई केल्याने साखरवाडी परिसरातील नागरिकांनी पोलिसांचे कौतुक केले.
या कारवाईमुळे आता अवैध धंदेवाल्याचे धाबे दणाणले आहेत. ही कारवाई माननीय पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, अप्पर पोलीस अधीक्षक अजित बोर्‍हाडे, उपविभागीय पोलीस अधिकारी तानाजी बरडे, पोलीस निरीक्षक धन्यकुमार गोडसे यांच्या मार्गदर्शनाखाली साखरवाडी दूरक्षेत्राचे महिला पोलीस उपनिरीक्षक सौ. स्वाती घोंगडे यांच्यासह रुपाली भिसे, सहाय्यक पोलीस फौजदार विलास यादव, मोहन हांगे, निखिल गायकवाड यांच्यासह पोलीस कर्मचार्‍यांनी कारवाईत सहभाग घेतला.

COMMENTS