Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

आ.थोरातंकडून बस अपघातातील जखमींना तातडीने मदत

संगमनेर प्रतिनिधी- कोळेवाडी येथे मुक्कामी असलेली बस सकाळी संगमनेर कडे येत असताना पिंपरने येथे पुलावरून बाजूला गेल्याने दुर्घटना झाली. या अपघाताची

राज्याच्या आरोग्यव्यवस्थेची श्‍वेतपत्रिका काढा
Sangamner : नांदुर ते बावपठार, माहुली रस्त्याची दुर्दशा (Video)
मोठी घडामोड… काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, महसूलमंत्री थोरात गेले फडणवीसांच्या भेटीला

संगमनेर प्रतिनिधी- कोळेवाडी येथे मुक्कामी असलेली बस सकाळी संगमनेर कडे येत असताना पिंपरने येथे पुलावरून बाजूला गेल्याने दुर्घटना झाली. या अपघाताची बातमी समजतात काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी तातडीने दुखापदग्रस्त विद्यार्थी व रुग्णांना संगमनेर येथील हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी आणले असून त्यांना त्वरित वैद्यकीय मदत पुरवली आहे. दैव बलवत्तर असल्याने कोणीही गंभीर दुखापत ग्रस्त नाही यानंतर तातडीने यशोधन कार्यालयाचे प्रमुख इंद्रजीत भाऊ थोरात यांनी या विद्यार्थी व नागरिकांची मेडिकवर हॉस्पिटल, कुटे हॉस्पिटल, शेळके हॉस्पिटल, व ग्रामीण रुग्णालयात जाऊन आस्तेवाईकपणे चौकशी केली.

सकाळी ही बस कोळेवाडी येथून मुक्कामी असताना संगमनेर कडे विद्यार्थी घेऊन येत होती. यामध्ये 48 प्रवासी प्रवास करत होते यामध्ये शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी जास्त होते . तांत्रिक कारणाने बस पलटी झाल्याने दुर्घटना झाली. मात्र दैव बलवत्तर म्हणून कोणीही गंभीर दुखापतग्रस्त झाले नाही. ही बातमी समजताच काँग्रेस पक्षाचे नेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी स्थानिक कार्यकर्त्यांना तातडीने मदतीच्या सूचना दिल्या यावरून जनसेवक व इतर पदाधिकाऱ्यांनी या जखमी रुग्णांना संगमनेर येथील हॉस्पिटलमध्ये उपचारार्थ आणले यावेळी संगमनेर बस स्थानकाचे डेपो मॅनेजर गुंड पाटील हेही उपस्थित होते

यावेळी बोलताना इंग्रजीत भाऊ थोरात म्हणाले की, संगमनेर शैक्षणिक केंद्र असल्याने ग्रामीण भागातील सर्व विद्यार्थी सकाळीच शाळा किंवा महाविद्यालयात येत असतात.  झालेली ही घटना दुर्दैवी असून असून सुदैवाने यामध्ये कोणीही गंभीर दुखापतग्रस्त नाही. काही विद्यार्थ्यांना किरकोळ जखमा झाले असून या सर्वांना वैद्यकीय उपचार देण्यात येत आहे पालकांनी व इतरांनी काळजी करू नये असे आवाहनही त्यांनी केले त्याचबरोबर एसटी महामंडळाने अधिक जबाबदारीने सेवा द्यावी असे आवाहन केले यावेळी पंचक्रोशीतील कार्यकर्त्यांसह अनेक विद्यार्थींचे पालक व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते आमदार बाळासाहेब थोरात यांनी केलेल्या तातडीच्या मदतीबद्दल सर्वांनी त्यांची कृतज्ञता व्यक्त केली

COMMENTS