Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

महापालिकेत भाजपचे ‘कमळ’ फुलले

आ. नमिता मुंदडा कडून मुख्यमंत्री व पंकजाताईंचे अभिनंदनकेज । प्रतिनिधीमहापालिका निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने मिळवलेल्या अभूतपूर्व व ऐतिहासिक यशामु

महायुतीतील भाजप-राष्ट्रवादीत ’तू-तू मैं-मैं’
राज्यात भाजपच ठरला पुन्हा ’धुरंधर’ !
भाजपचे नेते राज के. पुरोहित यांचे निधन

आ. नमिता मुंदडा कडून मुख्यमंत्री व पंकजाताईंचे अभिनंदन
केज । प्रतिनिधी
महापालिका निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने मिळवलेल्या अभूतपूर्व व ऐतिहासिक यशामुळे संपूर्ण राज्यभरात जल्लोषाचे वातावरण आहे. या विजयाचे श्रेय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपा प्रदेशाध्यक्ष चव्हाण तसेच ग्रामविकास व पर्यावरण मंत्री पंकजाताई मुंडे यांच्या सक्षम नेतृत्वाला दिले जात असून, त्यांच्यावर सर्व स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
केज विधानसभा मतदारसंघाच्या आमदार नमिता मुंदडा यांनी या विजयाला जनतेने विकासावर टाकलेला ठाम विश्वास असल्याचे नमूद केले. तसेच अंबाजोगाईचे नगराध्यक्ष नंदकिशोर (काकाजी) मुंदडा आणि युवा नेते अक्षय मुंदडा यांनी मुख्यमंत्री फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चव्हाण व मंत्री पंकजाताई मुंडे यांच्या दूरदृष्टीपूर्ण नेतृत्वामुळेच हे यश शक्य झाल्याचे सांगत त्यांचे विशेष अभिनंदन केले. या विजयाबद्दल बीड जिल्ह्यातील भाजप पदाधिकार्‍यांनीही आनंद व्यक्त केला आहे. केज तालुका अध्यक्ष भगवान केदार यांनी हा विजय कार्यकर्त्यांच्या मेहनतीचा व नेतृत्वाच्या दूरदृष्टीचा परिणाम असल्याचे सांगितले. कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती डॉ. वासुदेव नेहरकर यांनी राज्यात विकासाचे राजकारण अधिक वेगाने पुढे जाईल, असा विश्वास व्यक्त केला. तर अंबाजोगाई तालुका अध्यक्ष संजय गंभीरे यांनी पक्षाच्या संघटनात्मक बळाचा हा मोठा विजय असल्याचे नमूद केले. या निकालामुळे बीड जिल्ह्यासह संपूर्ण मराठवाड्यातील भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, आगामी काळात भाजपची पकड अधिक मजबूत होईल, असा विश्वास नेत्यांनी व्यक्त केला आहे.

COMMENTS