मुंबई महापालिकेसाठी भाजपचा ‘मेगा प्लॅन’… सुरु केली नवी रणनीती

Homeताज्या बातम्या

मुंबई महापालिकेसाठी भाजपचा ‘मेगा प्लॅन’… सुरु केली नवी रणनीती

प्रतिनिधी : मुंबई मराठी मुद्दा, मराठी भाषिकांच्या समस्या तसेच सत्ताधारी शिवसेनेने मराठी माणसावर केलेल्या अन्यायावर आवाज उठविण्याचे काम भाजप ‘म

चंद्रपुरात काँगे्रसला धक्का देत भाजपचा महापौर
मुख्यत्र्यांची सभा युतीच्या विजयाची नांदी ठरेल : माजी खा. विखे
भाजपातील खदखद उफाळली !

प्रतिनिधी : मुंबई

मराठी मुद्दा, मराठी भाषिकांच्या समस्या तसेच सत्ताधारी शिवसेनेने मराठी माणसावर केलेल्या अन्यायावर आवाज उठविण्याचे काम भाजप ‘मराठी कट्टा’ (Marathi Katta) या संकल्पनेच्या माध्यमातून करीत आहे.

मुंबई महापालिका निवडणुकीसाठी (BMC) राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. सर्व पक्ष मतदारांना आकर्षित करण्यासाठी वेगवेगळ्या योजना आखत आहे. 

भाजपनेही (BJP) पक्ष मजबुतीसाठी तयारी सुरु केली असून मराठी मतदारांकडे आपला कल वाढविण्याचे ठरविले. यापार्श्वभूमीवर भाजपकडून 

मुंबईत ‘मराठी कट्टा’ (Marathi Katta) ही नवी संकल्पना राबवण्यात येणार आहे. 1 ऑक्टोबरपासून ‘मराठी कट्टा’ संकल्पनेला सुरुवात होणार आहे.

आमदार नितेश राणे आणि सुनील राणे यांच्या खांदयावर या संकल्पनेची जबाबदारी देण्यात आली आहे. मुंबई महापालिका निवडणुकीत शिवसेनेला धडा शिकविण्यासाठी भाजप मैदानात उतरली आहे .

COMMENTS